Join us

'बिग बॉस' फेम सोफिया हयातला झाला होता गंभीर आजार, सर्जरीनंतरचा फोटो पाहून चाहते हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2023 19:33 IST

Sofia Hayat : 'बिग बॉस' फेम सोफिया हयातने इन्स्टाग्रामवर तिच्या शस्त्रक्रियेची माहिती दिली आहे. आजारपणापासून ते ऑपरेशननंतरची संपूर्ण प्रक्रिया अभिनेत्रीने शेअर केली आहे.

टीव्ही अभिनेत्री सोफिया हयात (Sofia Hayat) एका गंभीर आजाराची शिकार झाली आहे. वादात सापडलेल्या सोफियाने नुकतेच सांगितले की तिच्या आतड्यांमध्ये ६ सेमी गाठ होती. सध्या डॉक्टरांनी ऑपरेशन करून काढून टाकली आहे. शस्त्रक्रियेनंतर सोफियाने तिचे हेल्थ अपडेट सोशल मीडियावर शेअर केले आहे. यासोबतच अभिनेत्रीने तिच्या सर्जरीच्या खुणा दाखवणारे काही फोटोही शेअर केले आहेत. फोटो शेअर करताना सोफियाने सांगितले की, या आजारामुळे तिचे जगणे कठीण झाले होते. बाथरूममध्ये जाणे आणि शिंकण्याइतकाही तिच्या अंगात जीव उरला नव्हता.

'बिग बॉस' फेम सोफिया हयातने इन्स्टाग्रामवर तिच्या शस्त्रक्रियेची माहिती दिली आहे. आजारपणापासून ते ऑपरेशननंतरची संपूर्ण प्रक्रिया अभिनेत्रीने शेअर केली आहे. ऑपरेशननंतर स्टिच मार्क्स असलेली तिची काही फोटोही शेअर केली आहेत. यामध्ये सोफियाने पांढऱ्या रंगाचा स्पोर्ट्स आउटफिट परिधान केला आहे. तिच्या पोटावरील सर्जरीच्या खुणाही या फोटोत दिसत आहेत. फोटोंमध्ये सोफियाचे पांढरे केस देखील दिसत आहेत. अभिनेत्रीने फोटोसोबत एक लांबलचक कॅप्शनही लिहिले आहे.

सोफियाने सांगितले की, 'माझ्या पोटात सुमारे ६ सेमी असलेल्या गाठीची समस्या होती, ती आता दूर झाली आहे. मी कधीही आजारी पडले नव्हते. आता सुजलेल्या चेहऱ्यापासून हृदयविकाराच्या लक्षणांपर्यंत मला खूप त्रास झाला आहे. देवाच्या कृपेने मी आता बरी आहे. सोफियाने इन्स्टावर लिहिले, 'खूप वेळ लागत आहे... या काळात मला खूप मानसिक आणि आध्यात्मिक ताकदीची गरज होती. अगदी चालण्यापासून, बाथरूममध्ये जाण्यापासून, शिंकण्यापासून ते अंथरुणातून उठण्यापर्यंत माझ्या अंगात जीव उरला नव्हता. माझ्याकडे लक्ष ठेवण्यासाठी कुटुंबातील कोणीही सदस्य नाही. मला स्वतःची काळजी घ्यावी लागली. त्यांनी रुग्णालयातील त्यांच्या दोन परिचारिकांचा उल्लेख करून त्यांचे आभार मानले आहेत.

टॅग्स :बिग बॉस