Join us
Daily Top 2Weekly Top 5

बिग बॉस फेम शिल्पा शिंदे पहिल्यांदाच दिसणार महाराणीच्या भूमिकेत, बोल्ड लूकमधील फोटो होतोय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2020 20:06 IST

अभिनेत्री शिल्पा शिंदे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

छोट्या पडद्यावरील रिएलिटी शो बिग बॉसच्या ११व्या सीझनची विजेती अभिनेत्री शिल्पा शिंदे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. त्याला कारणही तसेच आहे. टेलिव्हिजननंतर शिल्पा शिंदे डिजिटल माध्यमात पदार्पण करते आहे. शिल्पा शिंदे पौरषपूर या वेब सीरिजमध्ये झळकणार आहे. ही सीरिज लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. यामध्ये शिल्पा राणी मीरावतीच्या भूमिकेत दिसणार आहे.

पौरषपूरच्या निमित्ताने बऱ्याच दिवसांनी प्रेक्षकांना मिस्ट्री आणि सस्पेन्स हा जॉनर एकत्र पाहायला मिळणार आहे. यामध्ये शिल्पा शिंदेचा लूक अतिशय वेगळा आहे.

आत्तापर्यंत शिल्पा शिंदेला निगेटिव्ह आणि कॉमेडी भूमिकांमध्ये प्रेक्षकांनी पाहिले आहे. पण पहिल्यांदाच तिने एका राणीची भूमिका साकारली आहे. टीझर रिलीज झाल्यानंतर मिलिंद सोमणच्या लूकचीही बरीच चर्चा झाली. या वेब सीरिजमध्ये शिल्पा शिंदे अतिशय बोल्ड अवतारात दिसणार आहे. 

काही दिवसांपूर्वीच शिल्पा शिंदे गँग्ज ऑफ फिल्मिस्तानमधून कमबॅक करणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. मात्र तिने या चित्रपटातून काढता पाय घेतला आहे. मेकर्ससोबत भांडण झाल्यामुळे तिने हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.

पौरषपूरमध्ये अन्नू कपूर राजा भद्रप्रताप सिंहच्या भूमिकेत आहेत. तर मिलिंद बोरीसच्या भूमिकेत आहे. शिल्पा शिंदे आणि शहीर शेख यांच्याही यात मुख्य भूमिका आहेत. सत्तेची लढाई, वासना, रक्ताने माखलेल्या तलवारी, युद्ध,कपट, राजकारण अशी पार्श्वभूमी असलेल्या या वेबसीरिजमध्ये अन्नू कपूर यांनी एका वासनांध राजाची भूमिका साकारली आहे. त्याच्या राज्यात महिलांना केवळ भोगाची वस्तू मानले जाते. पुरूषाच्या कुठल्याही मागणीला नकार देण्याचा अधिकार नाही.

यात मिलिंदने बोरिस नावाच्या ट्रान्सजेंडरची भूमिका साकारली आहे. येत्या २९ डिसेंबरला ही वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

टॅग्स :शिल्पा शिंदेमिलिंद सोमण