Join us  

प्रतीक्षा संपणार! लवकरच येणार Bigg boss 17? ; 'हे' कलाकार दिसणार नव्या पर्वात

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2023 1:34 PM

Bigg boss 17: हे नवीन पर्व कधी सुरु होणार याची तारीख सुद्धा समोर आली आहे.

छोट्या पडद्यावरील वादग्रस्त पण तितकाच चर्चेत येणारा कार्यक्रम म्हणजे बिग बॉस. आतापर्यंत या शोचे जवळपास १६ पर्व पार पडले असून प्रत्येक भाग तुफान लोकप्रिय झाला आहे. बिग बॉसच्या घरात स्पर्धकांमध्ये होणारे राडे, प्रेम प्रकरणं, वादविवाद, सलमान खानने सदस्यांची घेतलेली शाळा असा प्रत्येक मुद्दा सोशल मीडियावर गाजत असतो. त्यामुळे टेलिव्हिजनवरील लोकप्रिय कार्यक्रमांच्या यादीत या शोचं नाव घेतलं जातं. विशेष म्हणजे लवकरच या शोचं १७ वं पर्वदेखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

अलिकडेच बिग बॉस ओटीटीच्या सीझन २ चा ग्रँड फिनाले पार पडला. यावेळी बिग बॉस ओटीटी सीझन २चं विजेतेपद युट्यूबर एल्विश यादव याने पटकावलं. त्यानंतर आता कलर्स चॅनेल बिग बॉस १७ घेऊन येण्याची तयारी केली आहे. इतकंच नाही तर हा शो कोणत्या दिवशी रिलीज होणार याची तारीख देखील समोर आली आहे. 

कधी सुरु होणार बिग बॉस १७?

सूत्रांच्या माहितीनुसार, बिग बॉस १७ येत्या १५ सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. इतकंच नाही तर या पर्वात कोणते स्पर्धक सहभागी होणार यांची नावसुद्धा समोर आली आहेत. त्यानुसार, या नव्या पर्वात ऐश्वर्या शर्मा आणि UK07 रायडर उर्फ ​​अनुराग डोवाल हे दोघं सहभागी होणार आहेत. तसंच दिव्यांका त्रिपाठी, मनीषा राणी, जेनिफर विंगेट यांच्या नावांची चर्चा सुरु आहे.परंतु, याविषयी कलर्स वाहिनीकडून अद्यापही कोणती अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

दरम्यान, बिग बॉस १६ चं पर्व चांगलंच गाजलं होतं. या पर्वामध्ये मराठमोळा शिव ठाकरे, एमसी स्टॅन, प्रियांका चहर चौधरी, अर्चना गौतम आणि शालीन भानोत हे स्पर्धक टॉप ५ मध्ये दाखल झाले होते. परंतु, अखेर रॅपर एमसी स्टॅन १६ व्या पर्वाचा विजेता ठरला होता.

टॅग्स :बिग बॉससलमान खानशीव ठाकरेसेलिब्रिटीटेलिव्हिजन