Join us  

Bigg Boss 17 : 'बिग बॉस'च्या घरात अंकिताच्या पतीचं एक्स्ट्रा मॅरिटल अफेयर? सना खान आणि विकीचं चाललंय तरी काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2023 6:15 PM

'बिग बॉस'च्या घरात एन्ट्री केल्यापासूनच विकी घरातील इतर सदस्यांबरोबर त्याचं बॉण्डिंग तयार करत असल्याचं पाहायला मिळत होतं. आता विकीचं घरातच एक्स्ट्रा मॅरिटल अफेयर सुरू झालंय की काय अशा चर्चा रंगल्या आहेत. 

'बिग बॉस'चं यंदाचं पर्व अनेक कारणांमुळे चर्चेत आहे. कपल विरुद्ध सिंगल अशी थीम असलेल्या यंदाच्या पर्वात मराठमोळी अभिनेत्री अंकिता लोखंडे पती विकीसह सहभागी झाली आहे. पण, पहिल्या दिवसापासूनच त्यांच्यात खटके उडत असल्याचं पाहायला मिळत आहे. 'बिग बॉस'च्या घरात एन्ट्री केल्यापासूनच विकी घरातील इतर सदस्यांबरोबर त्याचं बॉण्डिंग तयार करत असल्याचं पाहायला मिळत होतं. आता विकीचं घरातच एक्स्ट्रा मॅरिटल अफेयर सुरू झालंय की काय अशा चर्चा रंगल्या आहेत. 

विकी अंकिताला कमी वेळ देत असल्याने आणि घरातील इतर सदस्यांबरोबर त्याचं रिलेशन बनवत असल्याने अंकिता नाराज असल्याचं याआधी पाहायला मिळालं होतं. तर दुसरीकडे विकी आणि सनामधील जवळीक वाढत असल्याचंही दिसत आहे. वीकेंड का वारमध्येही सलमान खानने विकीला सनावरुन चिडवलं होतं. 'बिग बॉस'च्या घरातील विकीचा एक व्हिडिओही समोर आला होता. यामध्ये त्याने सनाचा हात पकडलेला दिसत होता. या व्हिडिओमुळे विकीला ट्रोलही करण्यात आलं होतं. 

एवढंच काय तर विकीने आजपर्यंत सनाला कधीही नॉमिनेट केलेलं नाही. त्यामुळे त्यांच्यात नक्की काय सुरू आहे? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. यावरुनच अभिषेकने सनावरुन विकीला थेट प्रश्नच विचारला आहे. बिग बॉसच्या घरातील व्हायरल झालेल्या व्हिडिओत अभिषेक विकीला विचारतो की कारण असूनही तू सनाला नॉमिनेट का करत नाही आहेस? 

"तू सना खानच्या प्रेमात पडला आहेस का?", असं अभिषेक थेटच विकीला विचारतो. त्यावर उत्तर देत "असं काही नाही" असं विकी म्हणतो. त्यानंतर मुनव्वर आणि अभिषेक विकीला सनाच्या नावाने चिडवत असल्याचंही व्हिडिओत दिसत आहे. त्यामुळे विकी आणि सनाच्या नात्याबाबत आता प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. 

टॅग्स :अंकिता लोखंडेबिग बॉसटिव्ही कलाकार