Join us  

Bigg Boss 16: फिनालेच्या आधीच अब्दू रोजिक झाला आऊट,शिव ठाकरेच्या अश्रूंचा फुटला बांध

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2023 9:42 AM

अब्दू रोजिक(Abdu Rozik) प्रेक्षकांचं खूप प्रेम मिळालं. तो घरातून बाहेर होताच शिव ठाकरेसह साजिद खानला आपल्या डोळ्यांतील अश्रू थांबवत आलं नाही.

वादग्रस्त शो 'बिग बॉस 16'मध्ये एका पेक्षा एक स्पर्धक आहे. ज्यांनी आपल्या खेळानं चाहत्यांची मनं जिंकली आहेत. एक स्पर्धक भारतातला नसूनही त्याला प्रेक्षकांचं खूप प्रेम मिळालं. हा स्पर्धक आहे अब्दू रोजिक(Abdu Rozik) जो ताजिकिस्तानचा रहिवासी आहे. आपल्या क्युट पर्सनालिटीनं तो लाखो लोकांच्या मनावर राज्य करतोय. बिग बॉस 16 चा आगामी एपिसोड अब्दू रोजिकच्या चाहत्यांसाठी खूप भावूक करणार असणार आहे. बिग बॉस 16 चा नवा प्रोमो समोर आला आहे. प्रोमोमध्ये अब्दू रोजिक घरातून बाहेर पडताना दिसतो आहे. एकीकडे अब्दू रोजिक बिग बॉसच्या घरातून बाहेर पडला तर दुसरीकडे शिव आणि साजिद खानला अश्रू अनावर झाले. 

अब्दू रोजिक झाला घरातून बाहेरबिग बॉस फॅन क्लबवर सतत बातम्या येत होत्या की अब्दू रोजिक शोमधून बाहेर पडणार आहे. त्याचवेळी, प्रोमो पाहिल्यानंतर हे स्पष्ट होते की अब्दू रोजिकचा बिग बॉसमधील प्रवास संपला आहे. प्रोमोमध्ये बिग बॉसने म्हटले आहे की, 16 सीझनमध्ये हे पहिल्यांदाच घडत आहे. यानंतर अब्दू टनलच्या दिशेने जातो. निम्रत त्याला म्हणते, अब्दू, थांब. यानंतर कुटुंबातील सर्व सदस्य टनलजवळ येऊन उभे राहतात.

क्षणभर असे वाटले की नेहमीप्रमाणे हा बिग बॉसची प्रँक असू शकते. पण अब्दु रोजिक बिग बॉसच्या घरातून बाहेर पडतो. बिग बॉसच्या घरातील सर्व स्पर्धक अब्दू बाहेर पडताच भावूक होतात. अगदी शिवा, साजिद खान आणि टीना दत्ताही रडताना दिसतायेत. 

संपूर्ण सीझनमध्ये पहिल्यांदाच असे घडले की साजिद खान कुणासाठी तरी रडताना दिसला. अब्दु रोजिक आणि साजिद खान यांच्यात एक खास बॉन्ड आहे हे सर्वांनाच माहीत आहे. त्यामुळेच बहुधा साजिदला हे आधीच कळले होते की अब्दू निघून जाणार आहे.

प्रोमो पाहिल्यानंतर चाहते खूप भावूक झाले आहेत, संपूर्ण एपिसोड पाहिल्यानंतर लोकांची काय अवस्था काय होईल हे माहिती नाही.आजतकच्या रिपोर्टनुसार अब्दू व्यतिरिक्त साजिद खान शोमधून बाहेर पडणार आहे.  

टॅग्स :बिग बॉसशीव ठाकरेसाजिद खान