Join us  

Bigg Boss 15: टास्कसाठी एक नाही तर तब्बल ६ पुरूषांसोबत भिडली शमिता शेट्टी, चाहते म्हणताहेत-सशक्त नारी!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2021 8:33 PM

Bigg Boss 15: पुन्हा एकदा शमिता शेट्टीने मजबूत स्पर्धक असल्याचे सिद्ध केले आहे.

बिग बॉसच्या घरात दररोज नवीन ड्रामा पहायला मिळतो. शोमध्ये दररोज नवीन ट्विस्ट पहायला मिळत आहे. त्यामुळे चाहते आगामी एपिसोडसाठी प्रेक्षक उत्सुक असतात. काल रात्री जिथे नॉमिनेशन आणि नकाशा शोधताना भांडणे झाली. तर आज रात्री, घरातील सदस्या एका कार्यासाठी बंदुकांसोबत डाकूची भूमिका साकारणार आहे. प्रोमोने आधीच सर्वांची उत्सुकता वाढवली आहे. दरम्यान शमिता शेट्टी पुन्हा एकदा मजबूत स्पर्धक असल्याचे सिद्ध केले. 

एकीकडे शमिता शेट्टीचा जयसोबत मोठ्या आवाजात सामना करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे. तर दुसरीकडे एका टास्कसाठी सहा जणांविरोधात एकटी उभी राहिलेल्या तिच्या फोटोची खूप प्रशंसा होते आहे.

एका युजरने शमिताला विजेती मटेरियल म्हणत ट्विटरवर लिहिले की, सहा मुले तिला खेचत आहेत. या टास्कमध्ये १०० टक्के देताना दिसते आहे. सर्वात स्ट्राँग महिला. दुसऱ्या एका युजरने लिहिले की,  "#ShamitaShetty हॅण्ड्स डाउन, वर्तंमानात शोमधील सर्वात चांगली स्पर्धक आहे. सर्व पुरूषांच्या तुलनेत महिलांमध्ये जास्त हिंमत असते. अशापद्धतीने बिग बॉसच्या जंगलात डाकू टास्क पाहणे कमालीचे ठरणार आहे. यात शमिता शेट्टीचे मजेशीर रुप पहायला मिळणार आहे.

टॅग्स :बिग बॉस