Join us  

Bigg Boss 15: खुल्लमखुल्ला राखी सावंतच्या नवऱ्यानं तिला केलं किस, सांगितली त्यांची लव्हस्टोरी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2021 3:34 PM

राखी सावंत आणि तिचा नवरा रितेश यांची बिग बॉसच्या घरात एन्ट्री झाल्यापासून सर्वांचे लक्ष त्यांच्यावरच आहे.

यंदाचा बिग बॉसचा पंधरावा सीझन खूपच चर्चेत आला आहे. सुरूवातीला हा शो खूप मनोरंजक होत चालला होता, त्यानंतर तो पुन्हा कंटाळवाणा होत चालला आहे. मात्र राखी सावंत आणि तिचा नवरा रितेशची घरात एन्ट्री होताच पुन्हा एकदा शोमध्ये ट्विस्ट आला. काही तासाभरातच या पती पत्नीने घरातल्यांना आणि प्रेक्षकांना एण्टरटेन्मेंटचा डबल डोस दिला. राखीबद्दल सर्वांनाच माहित आहे. मात्र तिचा नवरा रितेश तिच्या पेक्षा चार पाउल पुढे आहे.

राखी सावंत आणि रितेशच्या बिग बॉस घरात एन्ट्री झाल्यानंतर सर्वांचेच लक्ष त्यांच्यावर लागून राहिले आहे. वेगवेगळे राहणारे बिग बॉसच्या घरातील सदस्य रितेश आणि राखी सावंतच्या घरात येण्यामुळे एकत्र आले आहेत. घरातील प्रत्येक सदस्याला राखी आणि रितेशची लव्हस्टोरी जाणून घ्यायची आहे. अखेर संधी साधून रश्मी, उमर आणि करण यांनी त्या दोघांना घेरले. सर्व रितेश आणि राखीसोबत डायनिंग टेबलवर बसतात. त्यावेळी रितेश सांगतो की तो आणि राखी व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून संपर्कात आले होते.

व्हॉट्सअॅपवरून त्यांची लव्हस्टोरी सुरू झाली आणि ही गोष्ट लग्नापर्यंत पोहचली. रितेश म्हणाला की, एका इव्हेंट दरम्यान पीएने त्याला राखीचा नंबर दिला होता. रितेशने कॉल ऐवजी राखीला हाय असा मेसेज केला होता. रितेशचे म्हणणे आहे की, त्यावेळी त्याच्या जीवनात खूप चढउतार येत होते. त्यामुळे त्याला त्यावेळी अशा व्यक्तीशी बोलायचे होते, जो त्याच्या पेशातील नव्हता.

...रितेशनेदेखील मानली नाही हारआता ड्रामा क्वीन राखीसोबत बोलणे इतके सोप्पे नव्हते. पण रितेशनेदेखील हार मानली नाही. त्यानंतर त्याने काही दिवसांनंतर राखीला दुसऱ्या नंबरवरून मेसेज केला. यावेळी राखीने ब्लॉक नाही केले, उलट तिने मेसेजचा रिप्लाय दिला. राखी म्हणाली की, त्यावेळी ती देखील उदास होती. तिचा एक बॉयफ्रेंड होता जो डॉन होता. याशिवाय त्याच्यावर खूप कर्ज होते. वाईट काळात राखीने रितेशकडे मदत मागितली आणि सोबतच लग्नाचा प्रस्ताव ठेवला.

रितेश-राखी दिसतात रोमँटिक अंदाजात

बिग बॉसच्या घरात बोलता बोलता रितेश-राखी रोमँटिक होताना दिसतात. इतकेच नाही तर रितेश प्रेमाने राखीला किसदेखील करतो. राखी आणि रितेशचे संभाषण ऐकून घरातल्यांना हसू आवरत नाही. इतकेच नाही तर इतर सदस्य त्यांना हनीमून वरून पिडताना दिसतात.

टॅग्स :बिग बॉसराखी सावंत