Join us  

Bigg Boss 15: राकेश बापट व नेहा भसीनच्या एन्ट्रीने घरात ‘भूकंप’, शमिताला अश्रू अनावर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 05, 2021 1:34 PM

Bigg Boss 15 wild card entries : ‘बिग बॉस 15’मध्ये अगदी काही दिवसांपूर्वीच राजीव अदातियाची वाईल्ड कार्ड एन्ट्री झाली होती. आता बिग बॉसच्या घरात आणखी दोन नव्या सदस्यांनी एन्ट्री घेतली.

बिग बॉस 15’मध्ये  (Bigg Boss 15) अगदी काही दिवसांपूर्वीच राजीव अदातियाची वाईल्ड कार्ड एन्ट्री झाली होती. आता बिग बॉसच्या घरात आणखी दोन नव्या सदस्यांनी एन्ट्री घेतली. होय, ‘बिग बॉस ओटीटी’मध्ये दिसलेले राकेश बापट (Raqesh Bapat) आणि नेहा भसीन (Neha Bhasin) या दोघांनी बिग बॉसच्या घरात एन्ट्री झालीये आणि या एन्ट्रीने सर्वाधिक कोण खुश्श आहे तर शमिता शेट्टी.

राकेश बापटला घरात पाहताच शमिता शेट्टी आनंदाने उड्या मारू लागली. राकेशने चिम्पांजीच्या गेटअपमध्ये घरात एन्ट्री घेतली आणि शमिताला मागून मिठी मारली. शमिता आधी जोरात किंचाळली आणि मग राकेश बापटला पाहून रडू लागली. ‘बिग बॉस ओटीटी’च्या घरात शमिता आणि राकेश बापट यांची रोमॅन्टिक केमिस्ट्री चर्चेचा विषय बनली होती. सध्या राकेश बापट हा शमिता शेट्टीचा बॉयफ्रेन्ड म्हणून ओळखला जातोय. ‘बिग बॉस ओटीटी’मधून बाहेर पडल्यानंतरही शमिता व राकेश एकत्र दिसले. आता हाच जीवाभावाचा राकेश घरात आल्यानंतर शमिता तर खुश्श होणारचं.

उर्वरित सदस्यांना ‘जोर का झटका’राकेश व नेहा भसीनच्या एन्ट्रीने शमिता खूश्श झाली. पण उर्वरित सदस्यांना मात्र ‘जोर का झटका’ बसला. प्रतीक सेहजपाल नेहा भसीनला भेटायला समोर जातो. पण नेहा त्याला थांबवत, माझ्या स्पेसमध्ये घुसू नकोस, असं सुनावते. नेहाचा घरात आल्याबरोबरचा हा अवतार पाहून प्रतीक शॉक्ड होतो. ‘बिग बॉस ओटीटी’च्या घरात नेहा व प्रतीक यांचं एकमेकांशी चांगलंच पटत होतं. पण बिग बॉस 15 मध्ये नेहा आल्याबरोबर प्रतीकशी फटकून वागू लागली आहे.एन्ट्री घेताच नेहाने प्रतीकला फटकारलं शिवाय करण कुंद्रालाही इशारा दिला. तुला जे काही बोलायचं आहे ते समोर बोलत जा, पाठीमागे नाही, असं ती करण कुंद्राला म्हणते. तिचं ते वाक्य ऐकून घरातील सदस्य हैराण होतात.एकंदर काय तर नेहा व राकेशच्या एन्ट्रीने ‘बिग बॉस 15’तील अख्खी समीकरणं बदलताना दिसणार आहेत. आता यात कोणाचं नातं बिघडतं आणि कोणाचं जुळतं, ते बघूच.

टॅग्स :बिग बॉसराकेश बापटनेहा भसीन