Join us  

 तो अ‍ॅटिट्यूड नव्हताच...! ट्रोल झाल्यानंतर ‘बिग बॉस’ विजेती रूबीना दिलैकने केला खुलासा   

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2021 1:01 PM

रूबीनाचा अ‍ॅटिट्यूड पाहून चाहतेही हैराण झाले होते. नुसते हैराण नाहीत तर काहींना तर उगाच रूबीनाला बिग बॉस 14 ची विजेती बनवले, असा ‘पश्चाताप’ चाहत्यांना झाला होता. पण रूबीनाचे मानाल तर हा अ‍ॅटिट्यूड अजिबात नव्हता.

ठळक मुद्दे‘बिग बॉस 14’मध्ये रुबीना दिलैकने पती अभिनव शुक्लासोबत एन्ट्री घेतली होती.

‘बिग बॉस 14’ची विजेती रूबीना दिलैकचा एक व्हिडीओ अलीकडे सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल  झाला होता. या व्हिडीओनंतर रूबीना जबरदस्त ट्रोल झाली होती.  या व्हिडीओतील रूबीनाचा अ‍ॅटिट्यूड पाहून चाहतेही हैराण झाले होते. नुसते हैराण नाहीत तर काहींना तर उगाच रूबीनाला बिग बॉस 14 ची विजेती बनवले, असा ‘पश्चाताप’ चाहत्यांना झाला होता. पण रूबीनाचे मानाल तर हा अ‍ॅटिट्यूड अजिबात नव्हता.

तर ‘बिग बॉस 14’ जिंकल्यानंतर रूबीना पहिल्यांदाच एअरपोर्टवर दिसली होती. रूबीनाला पाहून फोटोग्राफर्सचे कॅमेरे पुढे सरसावले होते. काही पत्रकारांनी रूबीनाला   काही प्रश्न विचारले होते. पण त्याकडे साफ दुर्लक्ष करत, रूबीना आपल्याच तो-यात निघून गेली होती. तिचा हाच अ‍ॅटिट्यूड चाहत्यांना आवडला नव्हता. यामुळे त्यांनी तिला ट्रोल करणे सुरु केले होते.

आम्ही चुकीच्या व्यक्तिला विजेता बनवले...! रूबीनाचा अ‍ॅटिट्यूड पाहून चाहत्यांना ‘पश्चाताप’!!

 ‘बिग बॉस जिंकल्यानंतर कोणी इतके कसे बदलू शकते?, शो जिंकल्यानंतर रूबीनाच्या डोक्यात हवा गेलीय, आम्ही चुकीच्या व्यक्तिला विजेता बनवले, असे लिहित लोकांनी रूबीनाला ट्रोल केले होते. आता रूबीनाने त्या व्हिडीओवर खुलासा केला आहे.एका ताज्या मुलाखतीत रूबीना यावर बोलली. त्या दिवशी ती अशी का वागली? याचे उत्तर तिने दिले.

रूबीना म्हणाली,

त्या दिवशी मी चंदीगडला जायला निघाले होते. तिथे माझे शूटींग होते. माझे नातेवाईकही चंदीगडला राहतात. मी बिग बॉसमध्ये असताना हार्ट अटॅकमुळे माझ्या आत्याचे निधन झाले होते. पण कुटुंबाने माझ्यापासून ही गोष्ट तेव्हा जाणीवपूर्वक लपवली होती. माझ्या आनंदावर विरजण पडावे, अशी त्यांची इच्छा नव्हती. पण मी चंदीगडला जातेय म्हटल्यावर त्यांनी मला आत्याच्या निधनाची बातमी सांगितले.  एअरपोर्टवर पोहोचण्यापूर्वीच मला आत्याच्या निधनाची बातमी कळली होती. मी शॉकमध्ये होते. कोणासोबतही बोलण्याच्या स्थितीत नव्हते, असे रूबीनाने या मुलाखतीत सांगितले. ‘बिग बॉस 14’मध्ये रुबीना दिलैकने पती अभिनव शुक्लासोबत एन्ट्री घेतली होती. रूबीना व अभिनव यांचा घटस्फोट होणार  होता.  याचदरम्यान या जोडप्याला बिग बॉस 14 ची आॅफर आली. या शोच्या निमित्ताने दोघांना एकमेकांसोबत वेळ घालवता आला. आता दोघांनी घटस्फोटाचा निर्णय मनातून काढून टाकला आहे. इतकेच नाही तर हे जोडपे लवकरच दुसºयांदा लग्न करणार आहे.  

टॅग्स :बिग बॉस १४