Join us  

...म्हणून १४ लाख रुपये घेऊन घराबाहेर पडली राखी सावंत; जिंकलेल्या पैशांतून करणार 'हे' काम

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2021 1:20 AM

Bigg Boss 14 For This Reason Rakhi Sawant Took ₹ 14 Lakh And Quit The Show: १४ लाख राखीच्या वाट्याला आले आहे. राखीसाठी ही रक्कम खूप मोठी असल्याचे तिने सांगितले. या रकमेचे राखी काय करणार असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. हे पैसे कशावर खर्च करणार याचे उत्तरही तिने दिले आहे.

बिग बॉस विजेत्याला ट्रॉफी आणि ५० लाख रोख रक्कम मिळणार होती. मात्र ही रक्कम नंतर कमी होऊन 44 लाख झाली. कारण एका टास्कमध्ये घरातील सदस्य राखी सावंत या रकमेपैकी १४ लाख रुपये घेऊन शोमधून बाहेर पडली. त्यामुळे विजेती रुबीनाच्या वाट्याला ४४ लाख रुपये आलेत. दरम्यान विजेती रुबीना तर बनलीय पण राखीने मध्येच शो सोडला आणि मिळालेली रक्कम घेत बाहेर पडली. १४ लाख राखीच्या वाट्याला आले आहे. राखीसाठी ही रक्कम खूप मोठी असल्याचे तिने सांगितले.  या रकमेचे राखी काय करणार असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. हे पैसे कशावर खर्च करणार याचे उत्तरही तिने दिले आहे. ही रक्कम तिला एका विशेष कामासाठी वापरायची आहे. 

राखीची आई आजारी असल्यामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले होते. त्यामुळे आईच्या उपचारासाठी राखी हे पैसे खर्च करणार असल्याचे तिने म्हटले आहे. तसेच आईची सगळी स्वप्न पूर्ण करायचं आहे. राखीला शोमध्ये सपोर्ट करण्यासाठी आलेल्या बिंदूनेही राखी जिंकणार नसल्याचे आधीच सांगितले होते. त्यामुळे जी रक्कम तिच्या वाट्याला येईल ते स्विकारुन शोमधून बाहेर पडण्याचा सल्ला राखीला दिला होता. बिंदूने राखीला दिलेला कानमंत्र तिने आतोनात पाळला. यांत मात्र निक्की तंबोलीच्या वाट्याला काहीच आले नाही. वेळीच राखीने बजर दाबल्यामुळे निक्की तंबोली मागे पडली.

 

बिग बॉसच्या फॅमिली वीक टास्कमध्ये राखी आणि तिच्या आईची व्हिडिओ कॉलद्वारे भेट झाली. त्यावेळी राखीच्या आईने तिच्यावर उपचार सुरू असून तिला खूपच त्रास होत असल्याचे राखीला सांगितले. आईची ही अवस्था पाहून राखी एखाद्या लहान मुलाप्रमाणे रडू लागली. राखीसोबत घरातील सगळ्याच स्पर्धकांच्या डोळ्यांत अश्रू आले होते.

टॅग्स :राखी सावंतबिग बॉस १४