Join us  

Bigg Boss 14: जास्मीन भसीन एकेकाळी करत होती हॉटेलमध्ये काम, आज आहे टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री

By गीतांजली | Published: October 08, 2020 5:43 PM

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री जास्मीन भसीने 'बिग बॉस 14'मध्ये धमाकेदार एंट्री घेतली आहे.

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री जास्मीन भसीने 'बिग बॉस 14'मध्ये धमाकेदार एंट्री घेतली आहे. जास्मीन भसीने केवळ टीव्ही शोमध्येच नव्हे तर बर्‍याच चित्रपटांमध्ये सुद्धा काम केले आहे. बिग बॉस 14 च्या घरात जास्मीनला किती प्रेम मिळालं हे पाहावं लागेल. जास्मीन भसीन टीव्ही शोसोबत सोशल मीडियाची क्वीन आहे. इन्स्टाग्रामवर तिचे लाखो फॉलोवर्स आहेत. 

शोमध्ये एन्ट्री घेण्यापूर्वी जास्मीनने तिची अनेक गुपीतं उघडी केली आहेत. सोशल मीडियावर तिटा एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. ज्यात जास्मीनला विचारण्यात आले आहे सकाळी उठल्यावर तू आधी काय करतेस ? त्यावर ती म्हणते मी सगळी उठल्या उठल्या आधी ब्लॅक कॉफी पिते. दुसरा प्रश्नात तिला विचारले घरात गेल्यावर तू सगळ्यात जास्त मिस कोणाला करशील ? याच उत्तर देताना ती म्हणाली,  मला माझ्या कुत्र्यांची सर्वात जास्त आठवण येईल कारण ते माझे कुटुंब आहे, ते माझ्यावर खूप प्रेम करतात.

राजस्थानच्या कोटा शहरातल्या जास्मीन भसीनला टीव्ही सीरियल 'तशान-ए-इश्क'मधून ओळख मिळाली. 28 जून 1990 साली शीख कुटुंबात जन्मलेल्या जास्मीनने जयपूरमधून ग्रॅज्युएशनची डिग्री घेतली आहे. एबीपी न्यूजच्या रिपोर्टनुसार अभिनय आणि मॉडेलिंग जगात पाऊल ठेवण्यापूर्वी जास्मीन भसीन दिल्लीच्या ताज पॅलेस हॉटेलमध्ये काम करायची.  

टॅग्स :जास्मीन भसीनबिग बॉस १४