Join us  

अखेर ठरलं ! 'बिग बॉस १४' चे स्पर्धक ख-या आयुष्यात अडकणार लग्नबंधनात, घरातच सुरु झाली होती लव्हस्टोरी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2021 7:00 PM

बिग बॉसने एजाजला पवित्रा पुनियाच्या भेटीच्या रूपात मोठे सरप्राईज दिले. पवित्रा एजाजला भेटायला बिग बॉसच्या घरात आली आणि तिने एजाजवरच्या प्रेमाची कबुली दिली.

छोट्या पडद्यावरील 'बिग बॉस-1४' हा रियालिटी शो सध्या चर्चेत आहे. बिग बॉसच्या घरातील स्पर्धकांमधील वाद, शोमधील अश्लीलता यामुळे बिग बॉसची चर्चा जोरात रंगते आहे. शो संपल्यानंतर या घरातील स्पर्धकांची लोकप्रियता कमी होत नाही. काही ना काही कारणांमुळे त्यांची तशीही चर्चा होत असते. बिग बॉसच्या घरात वाद रंगल्याचे एकमेकांचे कुरघोडी करताना आपण पाहिले आहे मात्र मनं जुळल्याची उदाहरणंही फार कमी आहेत. या सिझनची हीच खास बात होती.

 

या शोमुळे सगळ्यात आधी रुबीना दिलैक आणि अभिनव शुल्का यांचे नात्यांमध्ये काही कारणांमुळे कटुता निर्माण झाली होती. मात्र शोच्या निमित्ताने दोघेही पती पत्नी असलेले रूबीना आणि अभिनव यांची पुन्हा एकदा मनं जुळली आणि आता पुन्हा एकदा त्यांचा नव्याने संसार ते सुरु करणार आहेत. 

अशाच प्रकारे या शोचे  दुसरे स्पर्धक एजाज खान पवित्रा पुनिया 'बिग बॉस'च्या घरातच एकमेकांच्या प्रेमात पडले. दोघांनीही एकाचवेळी बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेतली. यादरम्यान दोघांत अनेकदा वाद झालेत आणि तसेच प्रेमही बहरले. काही आठवड्यानंतर पवित्रा घरातून आऊट झाली. मात्र एजाज अद्यापही बिग बॉसच्या घरात टिकून असून सध्या त्याची प्रॉक्सी म्हणून देबोलिनाने घरात एंट्री केली आहे. लवकरच हे दोघे लग्नही करणार असल्याचे चर्चा आहेत. यावर्षीच लग्नाचा बार उडणार असल्याचे बोलले जात आहे. नुकत्याच प्रसारीत झालेल्या बिग बॉस शोमध्येही या दोघांच्या लग्नाच्याच चर्चा ऐकायला मिळाल्या होत्या.

Bigg Boss 14 : अन् उतावीळ चाहत्यांनी थेट एजाज खान व पवित्रा पुनियाचे ‘लग्न’ लावून दिले!!

बिग बॉसने एजाजला पवित्रा पुनियाच्या भेटीच्या रूपात मोठे सरप्राईज दिले. पवित्रा एजाजला भेटायला बिग बॉसच्या घरात आली आणि तिने एजाजवरच्या प्रेमाची कबुली दिली. इतकेच नाही, तर माझ्या आईबाबांनी परवानगी दिली आहे आणि आता फक्त तुला माझ्या बाबांना भेटून मला मागणी घालायची आहे, असेही पवित्रा म्हणाली. नॅशनल टीव्हीवर पवित्राने अशा पद्धतीने एजाजवरचे प्रेम जगजाहिर केले आणि चाहत्यांच्या उत्साहालाही जणू भरती आली. चाहत्यांनी काय करावे तर थेट फोटोशॉपच्या मदतीने एजाज व पवित्राचे लग्न लावून दिले.

टॅग्स :बिग बॉस १४