Join us  

 शहनाज गिलला झाले तरी काय? पंजाबच्या ‘कतरिना कैफ’ला ओळखणेही झाले कठीण 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 02, 2020 8:00 AM

‘बिग बॉस 13’ने शहनाज गिल कधी नव्हे इतकी लोकप्रिय झाली.  ‘पंजाबची कतरिना कैफ’ म्हणून ओळखली जाऊ लागली. पण आता या पंजाबच्या कतरिना कैफला ओळखणेही कठीण झालेय.

ठळक मुद्देअलीकडे सिद्धार्थ शुक्लासोबतच्या लाईव्ह चॅटमध्ये वजन कमी करण्यासाठी मी डायटिंग करत असल्याची कबुली शहनाजने दिली होती.

बिग बॉस 13’ने शहनाज गिल कधी नव्हे इतकी लोकप्रिय झाली.  ‘पंजाबची कतरिना कैफ’ म्हणून ओळखली जाऊ लागली. पण आता या पंजाबच्या कतरिना कैफला ओळखणेही कठीण झालेय. होय, शहनाजने तिचे काही ताजे फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत आणि ते पाहून चाहते हैराण झालेत. आपल्या क्युटनेससाठी ओळखली जाणारी शहनाज ती हीच का? असा प्रश्न अनेकांना पडला. आता का? तर शहनाजने आपले वजन बरेच कमी केले आहे.

या नव्या अवतारातील फोटो तिने शेअर केलेत. यात ती अगदीच स्लिम दिसतेय. वजन कमी करण्याच्या नादात शहनाज भलतीच अशक्त दिसू लागलीये.  अलीकडे सिद्धार्थ शुक्लासोबतच्या लाईव्ह चॅटमध्ये वजन कमी करण्यासाठी मी डायटिंग करत असल्याची कबुली शहनाजने दिली होती. चांगले प्रोजेक्ट मिळवण्यासाठी वजन कमी करत असल्याचेही तिने सांगितले होते.

बिग बॉसने दिली ओळख बिग बॉसच्या घरातील सिद्धार्थ शुक्ला आणि शहनाजची केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड भावली होती. यामुळे अगदी काही दिवसांत शहनाजची फॅन फॉलोईंग मोठ्या प्रमाणात वाढली होती. सलमान खान याने शहनाजला  पंजाबची कतरिना कैफ हे नाव दिले आहे.  बिग बॉसमधून बाहेर पडल्यानंतर ‘शहनाज गिल की शादी’ या रिअ‍ॅलिटी शोमध्ये ती दिसली होती. अर्थात हा शो लोकांना फार आवडला नव्हता. 

कधीकाळी केला होता आत्महत्येचा प्रयत्नशहनाजला आज एंटरटेनमेंट क्वीन म्हणूनही संबोधले जाते.   ऑनस्क्रीन सा-यांना खळखळून हसवणारी शहनाज   कधी काळी डिप्रेशनमध्येही गेली होती. इतकेच नव्हेतर तिने आत्महत्या करण्याचाही प्रयत्न केला होता. खुद्द तिच्या वडिलांनीच या गोष्टीचा खुलासा केला होता. लिव्ह इन पार्टनरसोबत झालेल्या ब्रेकअपमुळे शहनाज डिप्रेशनमध्ये गेली होती. त्यावेळी सगळ्याच गोष्टी तिला निर्थक वाटू लागल्या होत्या. आयुष्याला कंटाळून तिने आत्महत्या करण्याचाही प्रयत्न केला असल्याचे तिच्या वडिलांनी सांगितले होते. 

 

टॅग्स :शेहनाझ गिलबिग बॉस