Join us  

Bigg Boss 13 : पाहा या विचित्र टास्कचा व्हिडिओ, तोंडाने एकमेकांना पुढे सरकवायचेत खाण्याचे पदार्थ

By ऑनलाइन लोकमत | Published: October 01, 2019 1:19 PM

बिग बॉसचा नुकताच एक प्रोमो प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. यात बिग बॉसची मालकिण म्हणजेच अमिषा पटेल स्पर्धकांना एक टास्क देताना दिसत आहे.

ठळक मुद्देस्पर्धकांना मालकिण तोंडाने रेशनिंग एकमेकांकडे देण्याविषयी सांगत आहे. खरे तर तोंडाने रेशनिंग एकमेकांकडे सुपूर्त करणे हा टास्क अनेकांना आवडलेला नाहीये. पण तरीही आपण हा टास्क पूर्ण करायचा असे हे स्पर्धक ठरवताना दिसत आहेत.

सलमान खानचा 'बिग बॉस 13' हा प्रसिद्ध रिॲलिटी शो नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या कार्यक्रमाची गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चा होती. बिग बॉस १३ चा पहिला प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीस आल्यापासून या कार्यक्रमात कोण कोण स्पर्धक हजेरी लावणार याचा अंदाज लावला जात होता. या कार्यक्रमाचा पहिला भाग प्रेक्षकांना रविवारी पाहायला मिळाला. यामध्ये सलमानने त्याच्या अंदाजात कार्यक्रमातील स्पर्धकांचे स्वागत केले. तसेच या कार्यक्रमामधील नवीन नियमांविषयी सांगितले. बिग बॉसच्या आधीच्या सिझनपेक्षा या सिझनचे नियम खूपच वेगळे असून यंदाच्या सिझनचे टास्कदेखील हटके असणार आहेत.

बिग बॉस 13 च्या प्रीमियरमध्ये सलमान आणि या कार्यक्रमातील स्पर्धकांचा धमाकेदार पराफॉर्मन्स प्रेक्षकांना पाहायला मिळाला. सध्या देवोलिना भट्टाचार्जी, रश्मी देसाई, सिद्धार्थ शुक्ला, शेहनाझ गिल, पारस छाब्रा, कोएना मित्रा, दलजीत कौर, सिद्धार्थ डे, आरती सिंग, आसिम रियाज, अबू मलिक, शेफाली बग्गा, माहिरा शर्मा यांसारखे स्पर्धक बिग बॉसच्या घरात प्रेक्षकांना पाहायला मिळत आहेत.

बिग बॉसचा नुकताच एक प्रोमो प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. यात बिग बॉसची मालकिण म्हणजेच अमिषा पटेल स्पर्धकांना एक टास्क देताना दिसत आहे. हा टास्क घराच्या रेशनचा आहे. स्पर्धकांना मालकिण तोंडाने रेशनिंग एकमेकांकडे देण्याविषयी सांगत आहे. खरे तर तोंडाने रेशनिंग एकमेकांकडे सुपूर्त करणे हा टास्क अनेकांना आवडलेला नाहीये. पण तरीही आपण हा टास्क पूर्ण करायचा असे हे स्पर्धक ठरवताना दिसत आहेत. पण या सगळ्यात पारस छाब्रा आणि सिद्धार्थ डे यांचे आसिम रियाजसोबत भांडणं होताना आपल्याला दिसत आहे.

बिग बॉस 13 च्या घरात पहिल्या दिवसापासूनच भांडणं सुरू झालेली आहेत. बिग बॉस प्रीमियरच्या भागात शेफाली बग्गा आणि शहनाझ कौर गिल यांच्यात वाद झाल्याचे आपल्याला पाहायला मिळाले. पहिल्या दिवसापासूनच सुरू झालेली भांडणं पाहाता या सीझनमध्ये चांगलेच वाद, भांडणं पाहायला मिळणार यात काहीच शंका नाहीये.

टॅग्स :बिग बॉससलमान खान