Join us  

Bigg Boss 13 : आरती सिंगला कधीच मिळाले नाही खऱ्या पालकांचे प्रेम, जन्म दिल्यानंतर लगेचच झाले आईचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: October 03, 2019 2:05 PM

आरती प्रसिद्ध अभिनेता गोविंदाची भाची असून कृष्णा अभिषेकची बहीण आहे. तिचे बालपण हे इतर मुलांपेक्षा खूपच वेगळे होते.

ठळक मुद्देमाझ्या आईच्या वहिनीनेच मला दत्तक घेतले आणि लहानाचे मोठे केले. ती माझ्या आईची खूपच जवळची मैत्रीण देखील होती. त्यामुळे मला माझ्या खऱ्या पालकांचे प्रेम कधीच मिळाले नाही.

सर्वात वादग्रस्त मानल्या जाणाऱ्या 'बिग बॉस' या शोची सुरुवात नुकतीच झाली आहे. यंदाच्या सिझनमध्ये आपल्याला आरती सिंगला बिग बॉसच्या घरात पाहायला मिळत आहे. आरती सिंग ही अभिनेता गोविंदाची भाची असून कृष्णा अभिषेकची बहीण आहे. आरती अतिशय श्रीमंत कुटुंबातील असली तरी तिचे बालपण हे इतर मुलांपेक्षा खूपच वेगळे होते. कारण तिच्या जन्मानंतर लगेचच तिच्या आईचे निधन झाले. त्यामुळे ती लहान असल्यापासूनच तिच्या एका नातेवाईकांसोबत राहात होती.

आरतीने तिच्या आयुष्यातील या घटनेविषयी एका मुलाखतीत सांगितले होते. ती म्हणाली होती की, मला जन्म दिल्यानंतर लगेचच माझ्या आईचे निधन झाले. त्यावेळी माझा भाऊ कृष्णा देखील केवळ दीड वर्षांचा होता. त्यामुळे तो माझ्या वडिलांसोबत मुंबईत राहायला लागला आणि मी प्री-मॅच्युर्अड बेबी असल्याने मी खूपच अशक्त होती. त्यामुळे माझ्या आईने मला तिच्या वहिनीकडे सुपूर्त केले. माझ्या आईच्या वहिनीनेच मला दत्तक घेतले आणि लहानाचे मोठे केले. ती माझ्या आईची खूपच जवळची मैत्रीण देखील होती. त्यामुळे मला माझ्या खऱ्या पालकांचे प्रेम कधीच मिळाले नाही.

या सगळ्यामुळे मला नेहमीच वाईट वाटायचे. पण माझ्या खऱ्या वडिलांसाठी आम्हाला दोघांना सांभाळणे कठीण होते. त्यांनी कृष्णाला आई-वडील दोघांचे देखील प्रेम दिले. पण मला ज्यांनी दत्तक घेतले, त्यांनी माझ्यावर प्रचंड प्रेम केले. मी पाच वर्षांची असताना मला ज्यांनी दत्तक घेतले, त्या माझ्या वडिलांचे निधन झाले. पण तरीही माझ्या आईने माझा एकटीने सांभाळ केला. मी त्यांची मुलगी नाहीये याची मला माझ्या आईने कधीच जाणीन देखील होऊ दिली नाही. अशी आई मिळाल्याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजते.

याविषयी पुढे ती सांगते, मी लहान असताना कृष्णा, रागिनी (रागिनी खन्ना), टीना (गोविंदाची मुलगी) यांना भेटल्यानंतर मला खूपच विचित्र वाटत असे. कारण त्यांच्यात आणि माझ्यात त्यावेळी मला खूप फरक जाणवायचा. ते तिघंही खूप चांगले इंग्रजी बोलायचे. पण मला तितके अस्खलित इंग्रजी बोलता यायचे नाही. या सगळ्यामुळे मी त्यांच्यापेक्षा खूपच वेगळी आहे असे मला वाटायचे. 

टॅग्स :बिग बॉस