Join us  

Bigg Boss 12 : असे आहे ‘बिग बॉस12’चे घर! पाहा, इनसाईड फोटो!!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2018 1:39 PM

 प्रत्येक सीझनमध्ये बिग बॉसचे घर अधिकाधिक सुंदर करावे, हाच निर्मात्यांचा प्रयत्न असतो. घराचा प्रत्येक कोपरा न कोपरा सुंदर असावा, डोळ्यांची पारणे फेडणारा असावा, जेणेकरून प्रेक्षकांना आपल्या टीव्ही सेटवर पाहताना मजा यावी, हा यामागचा उद्देश. 

‘बिग बॉस12’चा प्रीमिअर एपिसोड आज ९ च्या ठोक्याला आपण सगळे पाहू शकणार आहोत. यंदाच्या सीझनमध्ये सृष्टी रोडे, दीपिका कक्कड, अनुप जलोटा असे अनेक स्टार्स ‘बिग बॉस’च्या घरात दिसणार आहेत. तत्पूर्वी ‘बिग बॉस12’च्या घराचे काही फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. प्रत्येक सीझनमध्ये बिग बॉसचे घर अधिकाधिक सुंदर करावे, हाच निर्मात्यांचा प्रयत्न असतो. घराचा प्रत्येक कोपरा न कोपरा सुंदर असावा, डोळ्यांची पारणे फेडणारा असावा, जेणेकरून प्रेक्षकांना आपल्या टीव्ही सेटवर पाहताना मजा यावी, हा यामागचा उद्देश. यंदाही असेच काही आहे. बिग बॉसच्या घराचे हे फोटो पाहून तुम्हीही या घराच्या प्रेमात पडाल.

 ‘बिग बॉस12’मध्ये किचनपासून लिव्हिंग एरियापर्यंतचा संपूर्ण परिसर समुद्रासारखा सजवला आहे.

 गार्डन एरियाचे लूक तुम्हाला अगदी समुद्राकाठी उभे असल्याचा फिल देणारे आहे. यासाठी वेगवेळ्या स्टोन्सचा आणि शंख शिंपल्यांचा वापर करण्यात आला आहे.

 ‘बिग बॉस12’चे बेडरूमही असेच आहे. हे बेडरूम अंडर वॉटरचा अनुभव देणार आहे. तेव्हा बघा तर ‘बिग बॉस12’च्या घराचे काही खास फोटो.

बिग बॉस या कायक्रमाचे आजवरचे सगळेच सिझन हिट झाले आहेत. या कार्यक्रमाच्या गेल्या सिझनची विजेती शिल्पा शिंदे ठरली होती. यंदाच्या सिझनमध्ये स्पर्धक एकटे नसून जोड्यांमध्ये येणार आहेत. ही जोडी पती-पत्नी, मुलगा-मुलगी कोणाचीही असू शकते. तथापि, बिग बॉस 12 आता जोडीची संकल्पनाच बदलण्यासाठी सज्ज झाला आहे. कारण त्यांची थीमच आहे विचित्र जोड्या. सासू-सून, मामा-भाचा, मालक-नोकर अशा विविध जोड्या या कार्यक्रमाद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे. 

टॅग्स :बिग बॉस 12सलमान खान