Join us  

Bigg Boss 12 : आता भजनसम्राट अनूप जलोटा 'बेबी डॉल'च्या प्रेमात

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2018 2:24 PM

बिग बॉसच्या घरात अनूप जलोटा यांचे सुर बदलताना दिसत आहेत. चक्क सनी लिओनच्या 'बेबी डॉल' या गाण्यावर त्यांनी ठेका धरला.

ठळक मुद्दे 'बिग बॉस'च्या बाराव्या सीझनमध्ये नवनवीन टास्कअनुप जलोटांनी धरला बेबी डॉल गाण्यावर ठेका

लोकप्रिय हिंदी रिएलिटी शो 'बिग बॉस'च्या बाराव्या सीझनला नुकतीच सुरूवात झाली आहे. या सीझनमध्ये नवनवीन टास्क पाहायला मिळत आहेत. याचा पहिलाच भाग भजनसम्राट अनुप जलोटा व जसलिन मथारूच्या रिलेशनशीपच्या उलगड्याने प्रचंड गाजला. यावरून सोशल मीडियावर त्यांना खूप ट्रोलही करण्यात आले. आता तर बिग बॉसच्या घरात अनूप जलोटा यांचे सुर बदलताना दिसत आहेत. चक्क सनी लिओनच्या 'बेबी डॉल' या गाण्यावर त्यांनी ठेका धरला.

बिग बॉसच्या घरात आता स्पर्धकांना वेगवेगळे टास्क देण्याची सुरुवात झाली आहे. मागच्या भागात स्पर्धकांना 'राजा-राणी' हा टास्क देण्यात आला. या टास्कमध्ये अनूप जलोटा यांचा हटके अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या टास्क दरम्यान ते सनीचे आयटम नंबर 'बेबी डॉल' हे गाणे गाताना दिसत आहेत, तर त्यांच्याभोवती इतर स्पर्धक डान्स करताना दिसत आहेत. 

सोशल मीडियावर त्यांचा हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. चाहत्यांनी या व्हिडिओवर कंमेट करणेही सुरू केले आहे.'बिग बॉस १२' प्रीमिअरदरम्यान अनूप आणि जसलीन या दोघांनी नॅशनल टीव्हीवर त्यांच्या प्रेमाची कबुली दिली. ६५ वर्षांचे अनूप जलोटा अतिशय ग्लॅमरस अन् बोल्ड जसलीनला डेट करत आहेत. ती त्यांच्यापेक्षा ३७ वर्षांनी लहान आहे. आजपर्यंत अनूप व जसलीन दोघांनीही आपले नाते जगापासून लपवून ठेवले आणि अखेर नॅशनल टीव्हीसमोर याचा खुलासा केला. अनूप जलोटा यांनी तीन लग्ने केलीत. त्यांच्या तिसऱ्या पत्नीचे नाव मेधा गुजराल आहे. आता त्यांच्या या नव्या रिलेशनशीपच्या खुलाशानंतर 'बिग बॉस १२' अधिक रोचक झाले आहे.

टॅग्स :बिग बॉस 12अनुप जलोटा