Join us  

bigg boss 12:  काय म्हणता, अनूप जलोटा व जसलीनचे रिलेशनशिप केवळ एक स्टंट?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2018 4:27 PM

‘बिग बॉस12’च्या घरातील सर्वाधिक चर्चा आहे ती एका जोडीची.  होय, ही जोडी आहे, भजनसम्राट अनूप जलोटा आणि त्यांची गर्लफ्रेन्ड जसलीन मथारू यांची. 

‘बिग बॉस12’च्या घरातील सर्वाधिक चर्चा आहे ती एका जोडीची.  होय, ही जोडी आहे, भजनसम्राट अनूप जलोटा आणि त्यांची गर्लफ्रेन्ड जसलीन मथारू यांची. ६५ वर्षांचे अनूप जलोटा गत तीन वर्षांपासून स्वत:पेक्षा ३७ वर्षांनी लहान जसलीनसोबत रिलेशनशिपमध्ये आहेत. खुद्द अनूप आणि जसलीन यांनी ‘बिग बॉस12’च्या घरात प्रवेश करताना नॅशनल टीव्हीवर आपले रिलेशनशिप मान्य केले. पण खरे सांगायचे तर अजूनही ही गोष्ट अनेकांना पचलेली नाही. केवळ प्रेक्षकांनाच नाही तर ‘बिग बॉस12’च्या स्पर्धकांनाही अनूप व जसलीन कपल असल्याची गोष्ट पचवता आलेली नाही. (आज सोमवारी रात्री प्रसारित होणाऱ्या ‘बिग बॉस12’च्या एपिसोडमध्ये घरातील अनेक स्पर्धक अनूप व जसलीन यांच्या नात्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना दिसणार आहेत. हे दोघे कुठल्याही प्रकारे कपल वाटत नाहीत. त्यांच्यात कपल केमिस्ट्री नाही, असे मत अनेक स्पर्धक व्यक्त करताना दिसतील.)त्यामुळे ही रिलेशनशिप ‘प्लांड’ आहे, अशी चर्चा आता सुरू झाली आहे.जसलीनने काल सांगितले त्यानुसार, ती गत तीन वर्षांपासून अनूप यांना डेट करतेय. पण इतकी वर्षे हे रिलेशनशिप जगाच्या नजरेपासून लपून कसे राहिले, हा प्रश्न आहे. एकीकडे अनूप यांनी जसलीनसोबत घरात एन्ट्री घेतली. पण दुसरीकडे त्यांचा जोडीदार कोण असेल, हे त्यांनाही ठाऊक नव्हते. माझा जोडीदार सिंगर आहे, असे मी ऐकलेय, असे स्वत: अनूप यांनीच एका मुलाखतीत सांगितले होते.डीएनएने अनूप यांच्या एका जवळच्या मित्राच्या हवाल्याने याबाबत वृत्त दिले आहे. अनूप व जसलीन अजिबात रिलेशनशिपमध्ये नाहीत. ते केवळ अभिनय करत आहेत. हे सगळे शोसाठी केले जात आहे. चॅनलने त्यांना असे करायचे सुचवले नव्हते. पण त्यांनी स्वत:च लोकांचे लक्ष आपल्याकडे वेधण्यासाठी हा प्लान बनवला, असे या मित्राने स्पष्ट केले आहे. आता खरे काय ते लवकरच कळेलच. तोपर्यंत तरी अनूप जलोटा आणि जसलीन यांचे नाते मान्य केले पाहिजेच.

टॅग्स :बिग बॉस 12