Join us  

Bigg Boss 11 : सलमान खानने अर्शी खानला दिला दम; म्हटले, ‘आप अपनी कब्र खोद रही हैं’

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2017 11:54 AM

वीकेंड का वारमध्ये सलमान खान पुन्हा एकदा रुद्रवतार धारण करताना दिसला. घरातील बºयाचशा सदस्यांना त्याने खडेबोल सुनावले. सुरूवातीला गर्लफ्रेंडसवरून ...

वीकेंड का वारमध्ये सलमान खान पुन्हा एकदा रुद्रवतार धारण करताना दिसला. घरातील बºयाचशा सदस्यांना त्याने खडेबोल सुनावले. सुरूवातीला गर्लफ्रेंडसवरून त्याने प्रियांक शर्माची चांगलीच खिल्ली उडविली, परंतु दुसºयाक्षणी अर्शी खानला दमही दिला. त्याचे झाले असे की, अर्शी खानने शिल्पा शिंदेच्या आईसोबत केलेला उद्धटपणा त्याला अजिबातच आवडला नाही. त्यावरून त्याने अर्शी असे काही सुनावले की, तिने लगेचच शिल्पा शिंदेची माफी मागितली. यावेळी सलमानने हेदेखील स्पष्ट केले की, शिल्पा शिंदेने अर्शीच्या वडिलांना चुकीच्या नजरेने बघितले नाही. मात्र अशातही अर्शी सलमानला मी चुकली नसल्याचे म्हणत होती. अखेर सलमानने अर्शीला दम भरत ‘आप अपनी कब्र खोद रही हैं’ असे म्हटले. त्यावर अर्शीने माघार घेत शिल्पाची जाहीरपणे माफी मागितली. दरम्यान, सलमानने अर्शीला फटकारताना म्हटले की, ‘तू खूपच खराब खेळत आहेस. त्याचबरोबर वायफळ बोलत आहेस. घरातील तुझी वागणूक प्रेक्षकांना अजिबातच आवडत नाही. उलट बाहेर तुझी इमेज खराब होत आहे. शिल्पा शिंदेने असेच काहीच केले नाही, ज्यावरून असे दिसेल की ती तुझ्या वडिलांना चुकीच्या नजरेने बघत आहे.’ सलमानचे हे शब्द ऐकताच अर्शी खानने कांगावा करीत शिल्पाला पुन्हा दोष देण्यास सुरुवात केली. अर्शीने म्हटले, शिल्पा शिंदे हिने माझ्या वडिलांना चुकीचे नजरेने बघितले. मी माझ्या वडिलांच्या नावे चुकीचे बोलणार नाही. पुढे सलमानने म्हटले की, ‘आप जितना ज्यादा बोल रही हैं, आप उतनी अपनी कब्र खोद रही हैं.’दरम्यान, घरात काही टीव्ही कलाकारांनी एंट्री केली होती. त्यामध्ये करण पटेल, करिष्मा तन्ना, रोहन मेहरा यांचा समावेश होता. या तिघांनीही अर्शी खानला तिने केलेली चूक निदर्शनास आणून दिली. परंतु अशातही अर्शीने कोणाचाच सल्ला ऐकला नाही. उलट ती शिल्पाच्या विरोधात पुढच्या काळातही अशीच भूमिका घेणार असल्याचे म्हटले. असो, आज सुल्तानी अखाड्यामध्ये अर्शी आणि शिल्पाचा मुकाबला होणार आहे. यावेळेस तरी अर्शी माघार घेणार काय? हे बघणे औत्सुक्याचे ठरेल.