Join us

Bigg Boss 11:या स्पर्धकाचे पोलिस इन्स्पेक्टर बनण्याचे होते स्वप्न,पण......

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2017 17:33 IST

बिग बॉसच्या घरात सहभागी होणारे स्पर्धक हे वेगवेगळ्या भागातून वेगवेगळ्या क्षेत्रातून आलेले असतात. ब-याचदा संघर्षाच्या काळात आपल्याला हव्या असणा-या ...

बिग बॉसच्या घरात सहभागी होणारे स्पर्धक हे वेगवेगळ्या भागातून वेगवेगळ्या क्षेत्रातून आलेले असतात. ब-याचदा संघर्षाच्या काळात आपल्याला हव्या असणा-या गोष्टी किंवा स्वप्न पूर्ण होत नाही. अशीच एक स्पर्धक जिने बिग बॉसच्या घरात येताच आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. ती म्हणजे हरियाणवी डान्सर सपना चौधरी. सपना लहान असतानाच तिच्या वडीलांचे निधन झाले. त्यामुळे घराची जबाबदारी तिच्यावरच होती. उदरनिर्वाह करण्यासाठी सपनाने डान्स करत दोन पैसे कमावले.सपनाच्या अशाप्रकारे डान्स करण्यावरही ब-याच टीका झाल्या.मात्र कुटुंबाचे पोट भरण्यासाठी सपनाकडे दुसरा पर्याय नव्हता.लहानवयातच कुटुंबाची जबाबदारी आल्यामुळे तिला तिचे शिक्षणही पूर्ण करता आले नाही.सपनाचेही काही वेगळे स्वप्न होते.मात्र ते तिला पूर्ण करताच आले नाही.पोलिस इन्सपेक्टर बनण्याचे स्वप्न असल्याचे सपनाने बिग बॉसच्या घरात सांगितले. सपनाचे हे पोलिस इन्स्पेक्टर बनण्याचे स्वप्न असल्याचे ऐकताच सलमानही इमोशनल झाल्याचे पाहायला मिळाले.आपल्या डान्सिंग स्कीलच्या जोरावर आज सपनाने बॉलिवूडमध्ये आपला ठसा उमटवण्यास सुरूवात केली आहे.बॉलिवूडमध्ये ती आयटमसाँग करताना दिसणार आहे.'लव बाईट' नावाचे हे गाणे सोशल मीडियावर तुफान हिट ठरतंय. नुकताच तिचा डान्सिंग व्हिडीओ समोर आला आहे.बिग बॉसच्या घरात देसी अंदाजात दिसणारी सपना या आयटम साँगमध्ये खूप ग्लॅमरस दिसत आहे.विशेष म्हणजे हे गाणं टी-सिरीज सारख्या मोठ्या बॅनर अंतर्गत प्रदर्शित केले जाणार आहे.त्यामुळे बिग बॉस शोमध्ये झळकण्याआधीच सपनासाठी बॉलिवूडची सारी दारं खुली झाल्याचे पाहायला मिळाले.सपना तिच्या डान्स मुव्हजमुळे हरियाणाची शान म्हणून ओळखली जाते. मात्र ख-या आयुष्यात पोलिस इन्स्पेक्टर बनण्याचे स्वप्न उराशी बाळगणारी सपना लवकरच बॉलिवूडमध्ये ‘जर्नी ऑफ भांगओवर’ या सिनेमात सपना ‘लव्ह बाईट’ या गाण्यावर थिरकताना दिसणार आहे.पूर्वी सपना चौधरीने तिचा सुपरहिट डान्स ''तेरी अखियों का ये काजल'' या गाण्यावर ठेका धरत सा-यांनाच थिरकायला भाग पाडले.सगळे स्पर्धकही सपनाच्या डान्सवर फिदा झाल्याचे पाहायला मिळाले.त्यामुळे तशीच पसंती सपनाला बॉलिवूडमध्येही मिळते का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.