Join us

Bigg Boss 11 : बंदगी कालराचा आॅडिशन व्हिडीओ व्हायरल, ‘वडिलांमुळेच ‘बिग बॉस’च्या शोमध्ये झाली सहभागी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2017 18:35 IST

बिग बॉसच्या घरातील हॉट स्पर्धक म्हणून ओळखली जाणारी बंदगी कालराचा आॅडिशन व्हिडीओ समोर आला असून, वडिलांमुळेच मी या शोमध्ये सहभागी झाल्याचे तिने म्हटले आहे.

टीव्हीवरील सर्वाधिक वादग्रस्त रिअ‍ॅलिटी शो ‘बिग बॉस-११’ची सर्वाधिक हॉट स्पर्धक बंदगी कालरा सध्या पुनीश शर्मासोबतच्या वाढत्या जवळीकतेमुळे भलतीच चर्चेत आहे. दोघेही या शोमध्ये कॅमेºयासमोर असे काही कारनामे करीत आहेत, ज्यामुळे बाहेरील जगतात एकच खळबळ उडाली आहे. त्यातच आता बंदगीच्या आॅडिशनचा एक व्हिडीओ व्हायरल झाला असून, ती बिग बॉसच्या घरात कशी पोहोचली याचा प्रवास या व्हिडीओमध्ये दिसत आहे. युट्यूबवर शेअर करण्यात आलेला हा व्हिडीओ पाच मिनिटे ३३ सेकंदांचा आहे. ज्यामध्ये बंदगी स्वत:शी संबंधित माहिती सांगताना दिसत आहे. बंदगी या शोमध्ये येण्याचे कारण तिचे वडील असल्याचे सांगते. बंदगीला वाटते की, वडिलांनी तिच्यावर गर्व करावा.व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये बंदगी कालरा लाल रंगाच्या टॉप आणि सिल्व्हर शॉटर््समध्ये दिसत आहे. तिने या व्हिडीओमध्ये सांगितले की, ती पंजाबची असून, गेल्या दोन वर्षांपासून मुंबईमध्ये राहात आहे. बंदगी एक सीनियर सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून एका कंपनीत काम करीत आहे. या अगोदर बंदगी इनटर्नशिपकरिता दिल्लीला गेली होती. बंदगीने स्वत:विषयी सांगताना म्हटले की, ‘मी एक फनलविंग आणि रिएलिस्टिक मुलगी आहे. मला खोटे बोलणे अजिबातच आवडत नाही. त्याचबरोबर मी फेक लोकांचा तिरस्कार करते. मी ज्यांना पसंत करते त्यांना खूपच पसंत करते अन् ज्यांचा तिरस्कार करते त्यांचा खूपच तिरस्कारही करते. जेव्हा बिग बॉसमध्ये येण्याचे कारण विचारले जाते तेव्हा बंदगी सांगते की, मी माझ्या आयुष्यात बरेच काही मिळविले आहे. मी दिल्लीत कित्येक ब्यूटी कॉन्टेस्ट जिंकल्या आहेत. परंतु माझे वडील माझ्यावर गर्व करीत नाहीत. ते तेवढे आनंदी होत नाही, जेवढे त्यांना व्हायला पाहिजे. त्यांनी कधी कौतुकाची थाप माझ्या पाठीवर मारली नाही. यामुळेच मी या शोमध्ये येऊ इच्छिते. जेणेकरून माझ्या वडिलांनी माझ्यावर गर्व करावा. हा शो बरेच लोक बघतात, माझ्या घरातही हा शो बघितला जातो. त्याचबरोबर बंदगीला विचारण्यात आले की, तू बिग बॉसच्या घरात शंभर दिवसांचा प्रवास पूर्ण करणार काय? यावर उत्तर देताना बंदगीने म्हटले की, मी चार वर्षी पीजीमध्ये वेगवेगळ्या विचारांच्या लोकांमध्ये राहिली आहे. त्यामुळे मला असे वाटते की, मी कुठल्याही प्रकारच्या वातावरणात आरामात मिक्स होऊ शकते. परंतु बिग बॉसच्या घरात तिचे केवळ पुनीश शर्मासोबतच चांगले सूत जुळते. ती संपूर्ण दिवस पुनीश शर्मासोबतच बघावयास मिळते. त्याचबरोबर या व्हिडीओमध्ये बंदगी हेदेखील म्हणते की, तिचे मुलींसोबत फारसे सूत्र जुळत नाही. याचे कारण सांगताना बंदगीने म्हटले की, मुली नेहमीच माझ्या बॉयफ्रेंडला क्रश करतात. दरम्यान, बंदगीने वडिलांनी माझ्यावर गर्व करायला हवे असे जरी म्हटले असले तरी, बिग बॉसच्या घरातील तिचा वावर पाहता तिच्या घरात प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे. कारण बिग बॉसच्या घरात पुनीश शर्मासोबतचे तिचे कारनामे बघून तिच्या वडिलांना दवाखान्यात दाखल करावे लागल्याचे समोर आले होते. त्यानंतर बंदगीच्या भावाने हे वृत्त निराधार असल्याचे म्हटले होते. त्याचबरोबर मुंबईत बंदगीचा परिवार ज्या घरात राहतो, त्या घरमालकाने त्यांना बंदगीमुळे घर खाली करण्याचे बजावले असल्याचेही वृत्त समोर आले होते.