Join us

बिग बॉसच्या घरात रंगला जबरदस्त टीव्ही ड्रामा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2016 17:09 IST

दर आठवड्याला बिग बॉसच्या घरात ट्विस्ट निर्माण करण्यासाठी बाहेरील सेलिब्रिटींना घरात पाठविले जाते. यावेळेस बिग बॉसने काही टीव्ही स्टार्सना ...

दर आठवड्याला बिग बॉसच्या घरात ट्विस्ट निर्माण करण्यासाठी बाहेरील सेलिब्रिटींना घरात पाठविले जाते. यावेळेस बिग बॉसने काही टीव्ही स्टार्सना घरात पाठवून घरातील सदस्यांकडून जबरदस्त टीव्ही ड्रामा घडवून आणला. बानी, गौरव, लोपा आणि स्वामी ओमने केलेला अभिनय बघून टीव्ही स्टार्सदेखील थक्क झाले. }}}} ">http://त्याचे झाले असे की, बिग बॉसने ‘वीकेण्ड का वॉर’ एपिसोडमध्ये टीव्ही स्टार रूबिना दिलाइक, अदा खान, करणवीर बोहरा, मीरा डेयओस्थेल आणि विजेंद्र कुमेरिया यांना घरात प्रवेश दिला. सोबतच त्यांना घरातील सदस्यांकडून टीव्ही ड्रामा करण्याचा टास्कही दिला. या टास्कनुसार घरातील सदस्यांनी केलेला परफॉर्मन्स बघून टीव्ही स्टार्सही दंग राहिले. ‘नागिन’ सुपरहिट मालिकेतील स्टार्स घरात आल्याने बानी जे, गौरव चोपडा, लोपामुद्रा राऊत आणि स्वामी ओम यांना ‘नागिन’ याच मालिकेवर परफॉर्म करण्याचे सांगितले. त्यास गौरव आणि बानीने योग्य न्याय देत सगळ्यांनाच आश्चर्यचकीत केले.टास्कनुसार गौरव आणि बानी पती-पत्नी बनतात, लोपा नागिन, तर स्वामी ओम मांत्रिकाच्या भूमिकेत दाखविण्यात आले. लोपा आणि बानीमधील कॅटफाइट टास्कमध्येही दिसून येते. मात्र यावेळेस आपसात न भांडता आपल्या पतीला म्हणजेच गौरवला वाचविण्यासाठी बानी नागिन लोपाशी भिडते. बानी गौरवसाठी चहा बनवित असते. मात्र त्याचवेळेस नागिन लोपा त्या चहामध्ये जहर टाकते. गौरवने चहा पिताच तो जमिनीवर कोसळतो अन् तडफडायला लागतो. हे बघून त्याची पत्नी बानी त्याला शुद्धीत आणण्यासाठी आरडाओरड करते. त्यासाठी ती तांत्रिक स्वामी ओमचा धावा करते. तांत्रिक स्वामी ओम गौरवला उठविण्यासाठी मंत्रोपचार करून त्याच्या चेहºयावर पाणी फेकतो. काही वेळेनंतर गौरवला शुद्ध येते, हे बघून पत्नी बानीच्या जिवात जीव येतो. हा ड्रामा एवढा लाइव्ह आणि सिरियस वाटतो की, सोप्यावर बसलेली मोनालिसा आश्चर्यचकीत होवून बघत असते, तर टीव्ही स्टार्सही त्यांच्या या अ‍ॅक्टचे भरभरून कौतुक करतात. या टीव्ही ड्राम्यामुळे घरातील वातावरण काहीकाळ प्रफुल्लित झाले असले तरी, अ‍ॅक्टमधून दाखविलेली बानी आणि लोपामुद्रामधील दुश्मनी पुढील काळात एकमेकींना डंख मारण्यात कुठलीच कसर सोडणार नाही, हे मात्र नक्की. }}}} ">http://स्वामी ओमचा ‘नागिन’ डान्स‘वीकेण्ड का वॉर’ या एपिसोडमध्ये स्वयंघोषित बाबा स्वामी ओम चर्चेत नसेल तरच नवल. यावेळेसदेखील ओमने असा काही कारनामा केला, ज्यामुळे घरातील सदस्यांसमोर त्यांचा आणखी एक चेहरा उघड झाला. स्वामी ओमने अदा खानसोबत असा काही ‘नागिन डान्स’ केला, ज्यामुळे त्यांच्या धार्मिकतेवर घरातील सदस्यांनीच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. विशेष म्हणजे यावेळेस अदानेदेखील त्यांना पुरेपूर साथ दिली. त्यामुळे जोशात आलेल्या स्वामी ओमने जमिनीवर पडून नागिन डान्स केला. हे बघून घरातील अन्य सदस्य दंग राहिले.