Join us

Bigg Boss Marathi 3: “मी कोणाच्या बापाला घाबरत नाही” असं का म्हणाली सोनाली ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2021 15:34 IST

Bigg Boss Marathi 3: जय आणि मीरा या दोन कॅप्टन्सीच्या उमेदवारांमध्ये हा टास्क रंगला. यामध्ये जय विजयी ठरल्याने घरचा कॅप्टन होण्याचा बहुमान या आठवड्यात त्याला मिळाला.

छोट्या पडद्यावर सध्या मराठी बिग बॉसची धूम पाहायला मिळतेय. बिग बॉसच्या घरातील ड्रामेबाजी, वाद आणि काही भावुक क्षण यामुळे मराठी बिग बॉसचा तिसरा सीझन सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. बिग बॉसच्या घरात सगळ्याच स्पर्धकांनी रसिकांची मनं जिंकली आहेत. बिग बॉस मराठीच्या घरामध्ये  घरातले वाद, भांडणं काही नवीन नाही.  कोणत्या ना कोणत्या कारणामुळे स्पर्धक वादात अडकतात आणि त्याची चर्चा होते.  काल कॅप्टन्सी टास्क पार पडला. प्रत्येकावर हक्क गाजवणं, इतरांना स्वत:पेक्षा कमी लेखणं या स्वभावामुळं स्पर्धक आपापसात भीडताना दिसतात. घरात असा क्वचितच कुणी स्पर्धक असेल, ज्याचे कोणासोबत  भांडण झालं नाही.  

जय आणि मीरा या दोन कॅप्टन्सीच्या उमेदवारांमध्ये हा टास्क रंगला. यामध्ये जय विजयी ठरल्याने घरचा कॅप्टन होण्याचा बहुमान या आठवड्यात त्याला मिळाला.टास्क दरम्यान विकास – विशालमध्ये खूप मोठा राडा झाला. आणि याचमुळे विशाल, मीनल, सोनाली विकासवर नाराज आहेत. विकास आणि सोनालीमध्ये देखील भांडण सुरू आहेच. विकासचे वागणे, त्याचे बोलणे सोनालीला काही दिवसांपासून पटत नाहीये. आज मीनल आणि सोनाली घरात घडणार्‍या, ग्रुपमध्ये घडणार्‍या गोष्टींवर चर्चा करताना दिसणार आहेत.

 

मीनलचे सोनालीला म्हणणे आहे, आपल्या इमोशनचा फायदा घेतात सगळे. सोनाली म्हणाले, बोला तो कालच्या याच्यामध्ये...सगळंच कालचं काढले त्याने. विशाल निकमला म्हणे, कोण आहे हा विशाल निकम ? मी इथे घरात आल्यानंतर  कळालयं. तो माझा चांगला मित्र झाला, तो जसा चांगला मित्र झाला..तो जसा चांगला मित्र झाला तसा तू झाला, तशी मीनल झाली चांगली मैत्रीण झाली... मग मी तुम्हांला घाबरते. 

आपल्या बोलण्यावर ठाम राहण्याचा तिचा स्वभाव आहे तसेच ती म्हणाली की, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही. काहीपण बडबडत होता, की ज्याचा काही ताळ ना तंत्र. सगळं पर्सनल बोलत होता...” ही चर्चा अशी पुढे चालू राहिली.प्रत्येक गोष्टीपासून कायम पळ पेक्षा आता यांचा यांचा हा वाद कुठले नवीन वळण घेतो हे पाहणे रंजक असणार आहे.

टॅग्स :बिग बॉस मराठी