Join us  

Big Boss Marathi 2 : किशोरी शहाणे आणि पराग यांच्यात घरातील या सदस्याविरोधात होतंय गाॅसिप

By अजय परचुरे | Published: June 06, 2019 1:54 PM

बिग बॉस मराठी २ हा कार्यक्रम सुरू झाल्यापासूनच हा कार्यक्रम प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे.

ठळक मुद्देपराग आणि रूपाली यांच्यात बिग बाॅसच्या घरात सध्या घनिष्ट मैत्री झाली आहे. हे दोघंही बिग बाॅसच्या घरात सतत एकमेकांसोबत वेळ घालवत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. त्यामुळे घरातील इतर सदस्य या दोघांना चिडवण्याची एकही संधी सोडत नाहीयेत. 

चोर बाजार हा टास्क सध्या बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सुरु आहे. या टास्कमध्ये सदस्यांच्या बऱ्याच गोष्टी चोर टीमचे सदस्य चोरत आहेत.आणि यामध्येच रुपालीचा मेकअप कीट विरुध्द चोर बनलेल्या टीमने घेतला. पराग यावरूनच किशोरी शहाणे यांच्याशी गप्पा मारताना मजेत बोलताना म्हणाला कि, लोक २ तास ३७ मिनिटं मेकअप करत आहेत तर किशोरी शहाणेंमी रुपालीची बाजू घेत म्हणाल्या बिचारीचा मेकअप कीट चोरला आहे तरी सांभाळून घेते आहे. असं नाही हा बोलायच. तर पराग लगेच त्यावर म्हणाला, हे आपल्यातच राहु  द्या तिला नका सांगू मी असं बोललो नाही तर माझी वाट लागेल. तर परागला चिडवण्यासाठी किशोरी शहाणे म्हणाल्या मी वेळेला याचा उपयोग करणार.

हे संभाषण इथेच थांबले नाही यावर पराग म्हणाला. मी प्रयत्न करतो आहे करू दे .आता कसला प्रयत्न पराग करतो आहे ? हे त्यालाच माहिती... यावर किशोरी शहाणे म्हणाल्या डाळ शिजते आहे का ? किशोरी ताईनी परागची या गोष्टीवरून बरीच मजा घेतली आहे. पराग आणि रूपाली यांच्यात बिग बाॅसच्या घरात सध्या घनिष्ट मैत्री झाली आहे. हे दोघंही बिग बाॅसच्या घरात सतत एकमेकांसोबत वेळ घालवत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. त्यामुळे घरातील इतर सदस्य या दोघांना चिडवण्याची एकही संधी सोडत नाहीयेत. 

दरम्यान या टास्क दरम्यान किशोरी शहाणे अभिजीत केळकरवर खूपच नाराज झाल्या. कारण, त्याने आणि त्याच्या टीमने टास्क दरम्यान केलेली नासधूस त्यांना पटलेली नाही.... वीणाचे देखील मत हेच होते कि, अभिजीत केळकरने खूप वाईट पध्दतीने टास्क पार पाडला. हे वाद ज्यामुळे झाले ते किशोरी शहाणे यांचे सामान सापडले तरी देखील विरुध्द टीमला खजील वाटावे म्हणून वीणाच्या सांगण्यावरून किशोरींनी रडण्याचे नाटक केले. किशोरी शहाणे यांनी रुपालीला देखील सांगितले कि, अभिजित केळकरला मी सोडणार नाही. त्यांनी ही खंत बिचुकले यांच्याकडे देखील व्यक्त केली...  तर शिव इकडच्या गोष्टी तिकडे करतो असे म्हणणे वैशाली, दिगंबर यांचे पडले. तर शिवानीने अभिजित केळकर आणि माधव देवचकेला विरुध्द टीमचे बोलण सांगितले कि, या टीमने जंगली लोकांसारखा खेळ खेळला आपण तस नाही खेळायचे... आणि शिवानीने बोलताना माधव आणि अभिजीतला सांगितले मला पूर्ण खात्री आहे ते देखील तसाच खेळ खेळणार... आता विरुध्द टीम आज कोणत्या प्रकारे टास्क पाडेल हे आज बघायला मिळणार आहे... माधवने टास्क सुरु होणायाआधीच त्याचे काही कपडे लपवून ठेवले... तर वीणा दुसऱ्या टीमच्या सदस्याचे आणि रुपालीने अभिजीत बिचुकले यांचे कपडे टास्क सुरु होण्याआधी स्वत:च्या ताब्यात घेतले.