Join us

बिग बॉस : मोनाला पडायचे घराबाहेर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2016 16:03 IST

मनु पंजाबी आणि मोनालिसा यांच्यातील वाढत्या जवळीकतेमुळे मोनालिसाचा बॉयफ्रेंड विक्रांत सिंह याने तिच्याशी सर्वप्रकारचे नाते तोडण्याचा निर्णय घेतल्याचे तिला ...

मनु पंजाबी आणि मोनालिसा यांच्यातील वाढत्या जवळीकतेमुळे मोनालिसाचा बॉयफ्रेंड विक्रांत सिंह याने तिच्याशी सर्वप्रकारचे नाते तोडण्याचा निर्णय घेतल्याचे तिला कळून चुकल्याने आता तिला घराबाहेर पडायचे आहे. नॉमिनेशन प्रक्रियेत तिच्या सर्वात जवळचे मनु पंजाबी आणि मनवीर गुर्जर यांनी तिला नॉमिनेट केले आहे. विशेष म्हणजे मोनानेही स्वत:लाच नॉमिनेट करून घेत घराबाहेर पडण्याचा पक्का निर्धार केला आहे.}}}} ">http://आईच्या निधनामुळे घराबाहेर पडलेल्या मनु पंजाबीला मोनाचा बॉयफ्रेंड विक्रांत सिंह भेटला होता. त्याने मनुला म्हटले होते की, मला आता मोनालिसाबरोबर कुठल्याच प्रकारचे नाते ठेवायचे नाही. जेव्हा मनु घरात परतला तेव्हा त्याने ही बातमी मोनाला सांगितली. तेव्हापासूनच मोना अस्वस्थ झाली आहे. ती कुठल्याच अ‍ॅक्टिव्हिटीमध्ये भाग घेत नाही. शिवाय मनु, मनवीरबरोबरचे तिचे संबंधही पूर्वीसारखे राहिले नाही. घरात एम फॅक्टर म्हणून ओळखल्या जाणारे हे तिघेही आता एकमेकांपासून दूरावत आहेत. त्यातच बिग बॉसने मनु, मनवीर आणि रोहनसाठी त्यांच्याबद्दल घरातील सदस्य तथा बाहेरील जगतात काय चर्चा सुरू आहे, हे ऐकण्याची संधी दिल्याने मनु आणि मनवीर चांगलेच अस्वस्थ झाले. बानी, राहुल आणि गौरव गेल्या एका एपिसोडमध्ये मोना आणि मनवीर इंटिमेट झाल्याची चर्चा करतानाच व्हिडीओ मनवीरला ऐकविण्यात आला. त्यामुळे मनवीर, गौरव आणि बानीमध्ये चांगलीच बाचाबाची झाली. यात मोना आणि मनुनेही उडी घेतली होती. त्यानंतर मोनाला तिचा बॉयफ्रेंड सलमानच्या ‘विकेण्ड का वॉर’ या एपिसोडमध्ये आल्याचे दाखविण्यात आले. त्यामुळे ती चांगलीच अस्वस्थ झाली.}}}} ">http://ती एका कोपºयात बसून रडत होती. तसेच मला आता अजिबात घरात रहायचे नाही, असे वारंवार मनु आणि मनवीरला सांगत होती. त्यानंतर झालेल्या नॉमिनेशन प्रक्रियेत मोनाला मनवीर आणि मनुने नॉमिनेटही केले. परंतु मनु बिग बॉसला मोनाला नॉमिनेशन करण्यामागचे योग्य कारण सांगु शकला नसल्याने त्याचे मत बाद ठरविण्यात आले. त्यामुळे मनुने मोनाऐवजी प्रियंकाला नॉमिनेट केले. तसेच मोनाने जेव्हा स्वत:ला नॉमिनेट केले तेव्हा बॉग बॉसने असे करता येणार नसल्याचे सांगितले. मात्र घरातील अन्य सदस्यांनी मोनाच्या विरोधात मत दिल्याने ती या आठवड्यासाठी नॉमिनेट झाली आहे. तसेच गौरव आणि बानी हे दोघेही नॉमिनेट झाले आहेत. जेव्हा बिग बॉसने नॉमिनेट सदस्यांमध्ये मोनाचे नाव घेतले तेव्हा ती आंनदी झाल्याचे स्पष्टपणे तिच्या चेहºयावर दिसत होते. मात्र तिचा हा आनंद किती काळ राहणार हे लवकरच समजेल. कारण घरातील सदस्यांनी जरी तिला नॉमिनेट केले असले तरी, प्रेक्षक तिला घराबाहेर जावू देतात की नाही? हे बघणे औत्सुक्याचे ठरेल.