Join us  

​बिग बॉस फेम हिना खान अभिनयक्षेत्रात येण्यापूर्वी करत होती हे काम

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2018 7:02 AM

हिना खानने ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेपासून तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. या पहिल्याच मालिकेतील तिच्या भूमिकेला प्रेक्षकांनी ...

हिना खानने ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेपासून तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. या पहिल्याच मालिकेतील तिच्या भूमिकेला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले. अक्षरा या भूमिकेमुळे हिनाला एक वेगळी ओळख मिळाली. ती अनेक वर्षं या मालिकेचा भाग होती. पण काहीच महिन्यांपूर्वी तिने ही मालिका सोडली. या मालिकेनंतर ती पुन्हा कोणत्या मालिकेत झळकणार याची उत्सुकता तिच्या फॅन्सना लागली होती. पण या मालिकेनंतर कोणत्याही मालिकेत काम करण्याऐवजी हिनाने रिअॅलिटी शोमध्ये काम करणे पसंत केले. खतरों के खिलाडी या कार्यक्रमात ती झळकली. या कार्यक्रमात प्रेक्षकांना हिनाचा एक वेगळा अंदाज पाहायला मिळाला.सध्या हिना खान बिग बॉसच्या घरात असून ती बिग बॉसच्या विजेतेपदाची प्रबळ दावेदार मानली जात आहे. हिना ही केवळ तीस वर्षांची असून तिने खूपच कमी वयात अभिनयक्षेत्रातील तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. हिना खान ही मुळची काश्मीमधील श्रीनगर येथील असून तिने तिचे शिक्षण दिल्लीतून पूर्ण केले आहे. हिना खानने एमबीए केले असून शिक्षण सुरू असतानाच तिने ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेसाठी ऑडिशन दिले होते. या ऑडिशनमधूनच या मालिकेतील अक्षरा या प्रमुख भूमिकेसाठी तिची निवड करण्यात आली होती. हिना अभिनयक्षेत्रात येण्यापूर्वी कोणते काम करायची हे नुकतेच तिच्या वडिलांनी एका मुलाखतीत सांगितले आहे. हिना ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेत काम करण्याआधी एका कॉल सेंटरमध्ये काम करत होती. हिना मिडल क्लास कुटुंबातील आहे. तिचे कुटुंब श्रीनगर येथे राहाते. तिथेच तिने तिचे शालेय शिक्षण पूर्ण केले आहे. पुढील शिक्षणासाठी ती दिल्लीत स्थायिक झाली. तिचा भाऊ आणि ती दोघे शिक्षणासाठी अनेक वर्षं दिल्लीत राहात होते. तिने गुरगांवमधील एका इन्स्टिट्यूटमधून एमबीए केले आहे. एमबीएची फी प्रचंड असल्याने त्याचा भार आई-वडिलांवर येऊ नये यासाठी ती शिकत असताना एका कॉल सेटंरमध्ये नोकरी करत असे. Also Read : ड्रामा क्वीन हिना खानसोबत मॉलमध्ये असभ्य वर्तन; व्हिडीओ व्हायरल!