Join us

ढिण्चॅक पूजाच्या प्रेमात पडला हा बिग बॉसचा स्पर्धक,दिली आपल्या प्रेमाची कबुली

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2017 14:35 IST

सोशल मीडियावर ढिंण्चॅक पूजा प्रचंड लोकप्रिय आहे.तिच्या गाण्यांना नेटिझन्सचा तुफान प्रतिसाद लाभतो. तिची हीच लोकप्रियता कॅश करण्यासाठी आता तिची ...

सोशल मीडियावर ढिंण्चॅक पूजा प्रचंड लोकप्रिय आहे.तिच्या गाण्यांना नेटिझन्सचा तुफान प्रतिसाद लाभतो. तिची हीच लोकप्रियता कॅश करण्यासाठी आता तिची बिग बॉसच्या घरात एंट्री झालीय. यामुळे ढिंण्चॅक पूजाचे फॅन्स खुश असले तरी बिग बॉसच्या घरात आधीच दाखल असलेले स्पर्धक मात्र हैराण झालेत. ढिण्चॅक पूजाच्या घरात येण्याने काही स्पर्धक मात्र धास्तवलेही आहेत.ढिंण्चॅक पूजाच्या लोकप्रियतेमुळे आपलं बिग बॉसच्या घरातलं महत्त्व आणि रसिकांचं प्रेम कमी होईल अशी भीती घरातल्या इतर सदस्यांना वाटू लागलीय.त्यामुळंच की काय ढिंण्चॅक पूजा घरात दाखल होताच बिग बॉसच्या घरातल्या काही सदस्यांनी आता ना ना त-हेच्या शक्कल लढवत असल्याचे पाहायला मिळत आहे. होय, नुकतेच या घरातील स्पर्धक ददलानी कुटुंबाचा चिराग रॅपर आकाश ददलानीने तो चक्क पूजाच्या प्रेमात पडल्याचे अर्शी खानला सांगितले. आकाश आणि पूजा जेव्हा जेलमध्ये बंद करण्यात आले होते.त्यावेळी या पूजाने आकाशसह एक गोष्ट केली होती. हे ऐकताच मात्र पूजा भडकली आणि आकाशला अशा काहीही गोष्टी बोलून माझी प्रतिमा खराब करू नकोस असे सांगितले. भडकलेल्या पूजाला पाहून आकाशनेही आपली चुक स्विकारली आणि म्हणाला की अरे आपण दोघांनी मिळून रॅप साँग नव्हते का बनवले हे सांगायचे होते असे सांगत आकाशने ती वेळ मारून नेली.मात्र अर्शी समोर असल्यावर या प्रकरणाला नवीन वळण नाही मिळाले तरच नवल. त्यामुळे अर्शीने आकाशला पूजाला सॉरी म्हणायला सांगितले.त्यावेळी तो अर्शीनेच पूजाने आकाशची माफी मागताच स्माईल दिल्याचे सांगत आकाश पूजा तर खरंच तुझ्या प्रेमात आहे असे सांगत पूजाची आणि आकाशची टर खेचताना दिसली.आता आगामी काळात खरचं या दोघांची मैत्री रोमँटीक वळणावर येणार का हे पाहणे रंजक ठरणार आहे.पूजा ही स्वतःला रॅपर समजते त्यामुळे रॅपर आकाश ददलानीची तिच्याबरोबर खूप चांगली केमिस्ट्री जुळेल असे या घरातील स्पर्धकांना सुरूवातीपासूनच वाटत होते. त्यामुळे जेव्हा ढिण्चॅक पूजा घरात एंट्री करणार असल्याचे कळताच ददलानीला सुरूवातीपासूनच पूजाच्या नावाने चिडवले जायचे.  बिग बॉस घरात वाद,अफेअर होणं, किसिंग सीन आणि स्क्रीपटेड लग्नसोहळा रचणं हे बिग बॉसमध्ये रसिकांनी पाहिलं होतं.त्यामुळे आता या सिझनमध्येही असेच काहीसे दृश्य लवकरच पाहायला मिळणार असल्याचे चित्र आहे.