Join us  

'तेनाली रामा'मधील कृष्‍णा म्‍हणतो, भास्कराच्या भूमिकेने मला ही गोष्ट दिली

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2019 4:35 PM

कलाकारांना भूमिकेच्‍या लुकमध्‍ये सामावून जाण्‍यासाठी विविध बदल करावे लागतात.

कलाकारांना भूमिकेच्‍या लुकमध्‍ये सामावून जाण्‍यासाठी विविध बदल करावे लागतात. असेच परिवर्तन कृष्‍णा भारद्वाजमध्‍ये पाहायला मिळाले. त्‍याने सोनी सबवरील मालिका 'तेनाली रामा'मधील पंडित रामकृष्‍णची प्रमुख भूमिका साकारण्‍यासाठी सतत मुंडण केले आहे. आता नवीन सीझन 'तेनाली रामा: भास्‍कर अध्‍याय'सह हा प्रतिभावान अभिनेता मालिकेमध्‍ये रामाचा मुलगा भास्‍करसह दुहेरी भूमिका साकारत आहे. हे परिवर्तन कृष्‍णासाठी असाधारण व जीवनाला कलाटणी देणारे आहे.

मालिकेमधील परिवर्तनाबाबत बोलताना कृष्‍णा भारद्वाज म्‍हणाला, ''माझ्या मते अस्‍सलता महत्‍त्‍वाची आहे. मी सुरूवातीला चिंतित होतो. पण मी माझ्या पूर्वीच्‍या भूमिकेमध्‍ये अस्‍सलपणा आणण्‍यासाठी माझ्या डोक्‍याचे मुंडण करण्‍याचे ठरवले. आता मला भास्‍करची भूमिका साकारण्‍याची संधी मिळाली असल्‍याने मी माझ्या नवीन भूमिकेमध्‍ये सामावून जाण्‍यासाठी माझे डोक्‍यावरील केस वाढवत आहे. परिवर्तन अत्‍यंत रोचक आहेत, पण मी अशा आव्‍हानांमध्‍ये देखील सर्वतोपरी उत्‍तम काम करण्‍याचा प्रयत्‍न करत आहे.''

मालिकेमध्‍ये घेण्‍यात आलेली २५ वर्षांची काळझेप लक्षात घेत भास्‍करचा लुक तयार करण्‍यात आला आहे. तो पुढील पिढीमधील तरूण व जीवनाचा आनंद घेणारी व्‍यक्‍ती आहे आणि त्‍याचा पोशाख देखील त्‍याअनुषंगानेच बनवण्‍यात आला आहे. भास्‍करच्‍या पोशाखामधील रंगसंगती आणि आकर्षकता अत्‍यंत वैविध्‍यपूर्ण आहे. या पोशाखामधून भूमिकेला उत्‍साही व ऊर्जादायी लुक मिळतो. भास्‍करची पोशाख परिधान करण्‍याची स्‍टाइल आधुनिक व अद्वितीय आहे. तरूण व्‍यक्‍तीची जीवनशैली लक्षात घेत या स्‍टाइलची निवड करण्‍यात आली आहे. म्‍हणूनच हातांची मुक्‍तपणे हालचाल करता यावी म्‍हणून भास्‍करच्‍या खांद्यापर्यंतच ड्रॅपिंग करण्‍यात आली आहे. आभूषणे आकर्षक व अवजड आहेत, पण ते पोशाखाला अधिक आकर्षक बनवतात. 

टॅग्स :तेनाली रामासोनी सब