Join us

भारती सिंगच्या नवऱ्याने दिलेल्या गिफ्टच्या किमतीत येतील तुमच्या दोन कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2019 06:30 IST

भारती सिंगने नुकताच आपला 33वा वाढदिवस साजरा केला. बर्थ डेचे गिफ्ट म्हणून भारतीला पत्नी हर्ष लिम्बाचिया महागडं घड्याळ गिफ्ट दिलं.

ठळक मुद्देभारती सिंगने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करुन याची माहिती दिली

भारती सिंगने नुकताच आपला 33वा वाढदिवस साजरा केला. बर्थ डेचे गिफ्ट म्हणून भारतीला पत्नी हर्ष लिम्बाचिया महागडं घड्याळ गिफ्ट दिलं. भारती सिंगने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करुन याची माहिती दिली.   

भारतीने घड्याळाचा फोटो शेअर करताना त्याला एका कॅप्शन देखील दिले आहे. या गिफ्टबाबत तिने हर्षचे आभार मानले आहेत. या फोटोमध्ये तीन घड्याळं दिसतायेत. टाईम्स नाऊच्या रिपोर्टनुसार या घड्याळ्यांची किंमत जवळपास 12 ते 15 लाखपर्यंत असल्याचा अंदाज आहे. सध्या भारती 'खतरा खतरा खतरा'मध्ये काम करतेय. 

भारती आणि हर्षची भेट पहिल्यांदा कॉमेडी शोच्या सेटवर झाली होती. या शोदरम्यान दोघांमध्ये मैत्री झाली आणि त्यानंतर मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. यानंतर  ३ डिसेंबर, २०१७ साली भारती आणि हर्ष लग्नाच्या बेडीत अडकले.  भारतीच्या करिअरबाबत बोलायचे झाले तर द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज हा शो तिच्या करिअरमधला टर्निंग पॉइंट ठरला. या शोमधून भारतीला कॉमेडीयन म्हणून ओळख मिळाली आणि या शोमुळे तिच्या करियरला नवीन दिशा मिळाली. त्यानंतर भारती कॉमेडी सर्कसच्या काही सीझनची भाग होती. कॉमेडी व्यतिरिक्त भारतीने डान्स रिएलिटी शो झलक दिखला जा आणि आय कॅन डू दॅटमध्ये सहभागी झाली होती. डान्स व कॉमेडी सोबत भारतीने सूत्रसंचालनामध्ये आपलं नशीब आजमावलं. 

टॅग्स :भारती सिंग