कॉमेडियन भारती सिंग (Bharti Singh) बनली आई! त्यांच्या घरी कन्येचे आगमन झाले आहे! अरे अरे जरा थांबा, एवढं खुश व्हायची गरज नाही. कारण भारती सिंग आई झाल्याची बातमी खरी नाही. सध्या सोशल मीडियावर भारती सिंग आई झाल्याची बातमी व्हायरल होत आहे. पण या चर्चांवर अजिबात विश्वास ठेवू नका.
भारती सिंग अजून आई झालेली नाही. ती अजूनही खतरा खतरा या गेम शोचे शूटिंग करते आहे. आई झाल्याच्या खोट्या बातम्यांवर भारती सिंगनेही प्रतिक्रिया दिली आहे. लाईव्ह चॅटमध्ये भारतीने सांगितले की, मी प्रेग्नंट नाही. जे मला ओळखतात ते मला फोन करून अभिनंदन करत आहेत. मला मुलगी झाल्याच्या बातम्या येत आहेत. पण हे खरे नाही. मी खतरा खतरा शोच्या सेटवर आहे. इथे १५-२० मिनिटांचा ब्रेक आहे, त्यामुळे मला वाटले लाइव्ह येऊन सांगावे की मी अजून काम करते आहे.