Join us  

Confirm! 'भाभी जी घर पर हैं' मालिका सोडणार अनिता भाभी ऊर्फ सौम्या टंडन, 'हे' धक्कादायक कारण आलं समोर!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2020 3:12 PM

काही महिन्यांपासून सौम्या टंडन ही मालिका सोडणार असल्याची चर्चा सुरू होती. त्यावेळी सौम्याने ही बातमी अफवा असल्याचं सांगितलं होतं. पण आता पुन्हा एकदा दावा केला जातोय की, सौम्या मालिका सोडणार आहे.

सुपरहिट मालिका 'भाभीजी घर पर है' मध्ये दिसणारी गोरी मेम म्हणजे सौम्या टंडन काही दिवसांपासून फारच चर्चेत आहे. गेल्या काही महिन्यांपासून सौम्या टंडन ही मालिका सोडणार असल्याची चर्चा सुरू होती. त्यावेळी सौम्याने ही बातमी अफवा असल्याचं सांगितलं होतं. पण आता पुन्हा एकदा दावा केला जातोय की, सौम्या मालिका सोडणार आहे.

अफवा अफवा म्हणत आता सौम्याने या बातमीवर शिक्कामोर्तब केलंय. काही दिवसांपूर्वीच सौम्या टंडनने याचा खुलासा केला की, आता ती भाभीजी घर पर है मालिकेत दिसणार नाही. यावेळी टाइम्स ऑफ इंडियासोबत बोलताना ती म्हणाली की, होय...ही बातमी खरी आहे. मी आता माझा कॉन्ट्रॅक्ट वाढवणार नाहीये. २१ ऑगस्ट माझा सेटवरचा शेवटचा दिवस असेल'.

सौम्या पुढे म्हणाली की, 'आता लोकांना या गोष्टीचा अंदाज बांधत बसण्याची गरज नाही की, मी मालिका भाभीजी घर पर है मध्ये काम करणार किंवा नाही. मी ही मालिका सोडण्याचा निर्णय घेतलाय. लोकांना माझा निर्णय योग्य वाटणार नाही. पण सॅलरी मिळवण्याऐवजीही काही महत्वाची कामे असतात. इंडस्ट्रीमध्ये मला अजूनही काही प्रोजेक्ट मिळत आहेत. ज्यांवर मला काम करायचं आहे'.

सौम्या टंडनने पुढे सांगितले की, 'भाभीजी घर पर है मध्ये काम करून मी खूप काही शिकले. हा अनुभव माझ्यासाठी फारच शानदार होता. गेल्या ५ वर्षांपासून मी एकच भूमिका रोज जगते. आता मला एकाच भूमिकेत अडकून रहायचं नाहीये'. 

असं असलं तरी दावा तर हा केला जातोय की, सौम्या टंडन 'भाभीजी घर पर है'च्या मेकर्सकडून दिल्या जात असलेल्या मानधनामुळे नाराज आहे. काही दिवसांपूर्वीच सौम्या टंडनने कोरोना व्हायरसच्या काळात काम करणं घातक असल्याचं म्हटलं होतं. असे मानले जात आहे की, सौम्याने मानधन कमी मिळत असल्यानेच मालिका सोडली.

हे पण वाचा:

जेनिफर विंगेटचा बिग बॉसच्या नव्या सीझनमध्ये येण्यास नकार, इतक्या कोटींची दिली होती ऑफर...

'तारक मेहता का उल्टा चष्मा'मध्ये या अभिनेत्याची एन्ट्री, 12 वर्षांपूर्वीच मिळाली होती ऑफर

TRP साठी काहीही ! 'देवमाणूस' मालिका सुरू होण्याआधीच रसिकांनी फिरवली पाठ ? प्रोमो पाहून व्यक्त केला संताप

टॅग्स :सौम्या टंडनटेलिव्हिजन