जेनिफर विंगेटचा बिग बॉसच्या नव्या सीझनमध्ये येण्यास नकार, इतक्या कोटींची दिली होती ऑफर...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2020 12:36 PM2020-08-18T12:36:27+5:302020-08-18T12:52:41+5:30

दुसरीकडे अशीही बातमी समोर येत आहे की जेनिफरने शो नाकारला असला तरी तिचा को-स्टार राहिलेल्या शिविन नारंगचं बिग बॉस १४ मध्ये येणं फिक्स झालंय

बिग बॉसचं १३ वं सीझन चांगलंच हिट ठरलं. आता १४वं सीझन आणखी सक्सेस करण्याची मेकर्सची जबाबदारी वाढली आहे. त्यामुळे या शोचे मेकर्स टीव्ही इंडस्ट्रीतील मोठ्या कलाकारांना अॅप्रोच करत आहेत. जेणेकरून टीआरपीमध्ये फायदा मिळावा.

बिग बॉसच्या चाहत्यांसाठी बातमी आहे की, मेकर्सनी सीझन १४ साठी टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय चेहरा जेनिफर विंगेटला संपर्क साधला होता. पण फॅन्ससाठी निराशाजनक बाब ही आहे की, जेनिफरने हा शो करण्यास नकार दिलाय.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, जेनिफरला बिग बॉस १४ चा भाग होण्याची ऑपर देण्यात आली होती. इतकेच नाही तर यासाठी तिला मोठी रक्कमही ऑपर करण्यात आली होती. तिला या शोसाठी तब्बल ३ कोटी रूपयांची ऑफर देण्यात आली होती.

पण जेनिफर विंगेटने हा शो करण्यास स्पष्टपणे नकार दिलाय. याआधीही मेकर्सनी अनेकदा जेनिफरला या शोमध्ये सहभागी होण्यासाठी अॅप्रोच केलं होतं. पण तेव्हाही तिने नकार दिला होता.

तर दुसरीकडे अशीही बातमी समोर येत आहे की जेनिफरने शो नाकारला असला तरी तिचा को-स्टार राहिलेल्या शिविन नारंगचं बिग बॉस १४ मध्ये येणं फिक्स झालंय.

रिपोर्टनुसार, बिग बॉस २०२० साठी शिविनचं नाव कन्फर्म झालंय. गेल्यावर्षीही शिविनला यासाठी अॅप्रोच करण्यात आल होतं. पण 'बेहद २'मुळे शिविनने शो करण्यास नकार दिला होता.

सध्या शिविनकडे दुसरा कोणताही शो नाही. अशात तो बिग बॉस १४ चा भाग होऊ शकतो. तसेच तो शोमध्ये येण्यास पूर्णपणे तयार असल्याचं बोललं जात आहे.

जेनिफर आणि शिविनने बेहद २ मध्ये एकत्र काम केलं होतं. दोघांची जोडी लोकांना फारच आवडली होती. बेहद २ नंतर दोघेही खतरों के खिलाडीमध्ये सहभागी झाले होते.

दरम्यान जेनिफर विंगेटबाबत सांगायचं तर ती बेहद २ मध्ये दिसली होती. जेनिफर वेब सीरीजमध्येही सक्रिय आहे. जेनिफरची फॅन फॉलोईंग मोठी आहे. ती सोशल मीडियातही बरीच अॅक्टिव असते.

जेनिफरला टीव्हीवरील सर्वात टॅलेंटेड आणि सुंदर अभिनेत्रींपैकी एक मानलं जातं. जेनिफर एक चांगली पऱफॉर्मर आहे. बेहद सीरीजमधील तिची ग्रे शेड असलेली भूमिका चांगली लोकप्रिय ठरली होती.

Read in English