Join us  

ऐकलं का,सौम्या टंडनने मार्च महिन्यातच सोडली ही मालिका,सध्या आहे नोटिस पीरियडवर?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2018 4:58 PM

सौम्याकडून मालिका सोडल्याबाबत कोणत्याही प्रकारचे स्पष्टीकरण दिलेले नाही.

छेट्या पडद्यावर सध्या विविध मालिका रसिकांचं मनोरंजन करत आहेत. मालिकांच्या कथानकामधील रंगतदार वळण यामुळे काही मालिका रसिकांच्या मनात घर करुन गेल्या आहेत. अशाच मालिकांपैकी एक मालिका म्हणजे 'भाभीजी घर पर हैं'. मालिकेतील प्रत्येक व्यक्तीरेखा रसिकांना भावली आहे. ही मालिका दिवसेंदिवस रसिकांच्या पसंतीस पात्र ठरत आहे. या मालिकेत दिवसागणिक येणारे ट्विस्ट आणि रंजक कथानक यामुळे मालिका लोकप्रिय ठरली आहे. यातील प्रत्येक व्यक्तीरेखा रसिकांच्या पसंतीस उतरली आहे. यापैकी एक खास आणि विशेष व्यक्तीरेखा म्हणजे अनिता भाभी म्हणजेच सौम्या टंडन.अनिता भाभीच्या चाहत्यांसाठी हिरमोड करणारी बातमी आहे.

 

सौम्याने 'भाभीजी घर पर हैं' या मालिकेला मार्च महिन्यातच राम राम ठोकला असून सध्या ती नोटीस पिरियडवर असल्याच्या चर्चा आहेत. काही दिवसांपासून तिची तब्येत बरी नसल्यामुळे तिला या मालिकेतून काही दिवसांसाठी सुट्टी घेतल्याचेही कळतंय.तर दुसरीकडे मीडिया रिपोर्टनुसार सौम्याने ही मालिका सोडल्याच्याही चर्चा आहेत.सौम्याकडून मालिका सोडल्याबाबत कोणत्याही प्रकारचे स्पष्टीकरण दिलेले नाही.काही वर्षांपासून ती ही मालिका करत आहे.आता तिला काहीतरी वेगळे करायेच आहे.साचेबद्ध कामात रस नसून हटके भूमिका साकारण्याचे तिने ठरवले आहे.म्हणूनच ती नवीन कामाच्या शोधातही असल्याचे बोलले जात आहे.

काही दिवसांआधी  अंगुरी भाभी  म्हणजचे शुभांगी अत्रे ही मालिका सोडणार असल्याच्या चर्चा होत्या. त्यानंतर ती शो सोडणार नसल्याचे स्पष्ट झाले होते. आता सौम्या टंडन ही मालिका सोडणार असल्याच्या बातम्यांवर जोपर्यंत स्पष्टीकरण देत नाही तोपर्यंत यांत किती सत्यता हे तर वेळ आल्यावरच स्ष्ट होईल.अंगुरी भाभी प्रमाणे अनिता भाभीचाही चाहता वर्ग जास्त आहे.त्यामुळे सौम्याची मालिकेतून एक्झिट झाल्यास तिच्या फॅन्सचा हिरमोड होणार हे मात्र नक्की.

सौम्या टंडनला आमिर खानचे सिनेमे खूप आवडतात. ती आमिरची डाय हार्ड फॅन आहे. त्याचबरोबर नसिरूद्दीन शहा आणि राणी मुखर्जी यांचा अभिनय देखील तिला खूप भावतो. एका मुलाखतीदरम्यान तिने सांगितले की,आमिर खरच परफेक्शनिस्ट आहे.त्याच्या अभिनयाप्रमाणेच त्याचे सिनेमाही दमदार असतात. मी आमिरचे सर्व सिनेमा आवर्जून बघते.