Join us

मीडियापेक्षा अभिनयात अधिक रस असल्याने या क्षेत्राकडे वळलोः नमिक पॉल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2017 17:06 IST

नमिक पॉलने कबूल है या मालिकेत छोटीशी भूमिका साकारली होती. त्यानंतर तो एक दुजे के वास्ते या मालिकेत मुख्य ...

नमिक पॉलने कबूल है या मालिकेत छोटीशी भूमिका साकारली होती. त्यानंतर तो एक दुजे के वास्ते या मालिकेत मुख्य भूमिकेत झळकला. आता तो एक दिवाना था या मालिकेत प्रेक्षकांना शीव या महत्त्वाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. त्याच्या आजवरच्या करियरविषयी त्याच्याशी मारलेल्या गप्पा...नमिक तू पत्रकार असताना अभिनयक्षेत्राकडे कसा वळलास?मी एनडिटिव्ही या वहिनीत पॉलिटिकल बीट सांभाळत होतो. मीडियामध्ये मी काम करत असलो तरी हे क्षेत्र आपल्यासाठी नाही असे मला सतत वाटत असे. या क्षेत्रात तुमच्या कामकाजाच्या वेळा नसतात. तसेच एखादी ब्रेकिंग स्टोरी आली तर त्यावर तात्काळ काम करावे लागते. हे सगळे करणे खूपच कठीण असते. त्यामुळे या क्षेत्रात आपले काही खरे नाही असे मला नेहमी वाटत असे आणि त्यातही मीडियापेक्षा मला अभिनय क्षेत्रात अधिक रस होता. त्यामुळे मी नोकरी सोडून मुंबईत आलो. मुंबईत आल्यावर काम मिळणे तितकेसे सोपे नव्हते. मला खूप मेहनत करावी लागली, अनेक ऑडिशन द्याव्या लागल्या. पण आज मागे वळून पाहिले तर माझ्या मेहनतीचे मला फळ मिळाले आहे असे मला वाटते.एक दिवाना था या मालिकेतील तुझ्या भूमिकेविषयी काय सांगशील?या मालिकेत मी भूताची भूमिका साकारत आहे. या मालिकेत प्रेक्षकांना प्रेम त्रिकोण पाहायला मिळणार असून प्रेमासाठी असलेली दिवानगी या मालिकेत दाखवली जाणार आहे. मी आजवर साकारलेल्या भूमिकांपेक्षा ही एक वेगळी भूमिका असल्याने मी या मालिकेत काम करण्याचा निर्णय घेतला. या मालिकेत मी भूत असल्याने मला काहीतरी हटके करायला मिळणार आहे.तू या मालिकेत भूताची भूमिका साकारत आहेस, तुझा स्वतःचा भूतावर विश्वास आहे का?माझा भूतावर अजिबातच विश्वास नाही. पण भूताचे चित्रपट पाहायला मला खूप आवडतात. बॉलिवूड आणि हॉलिवूडमधील भूतावर आधारित अनेक चित्रपट मी आवर्जून पाहातो.एक दुजे के वास्ते ही तुझी मालिका प्रचंड गाजली होती, तुझे फॅन्स भेटल्यावर या मालिकेविषयी तुझे किती कौतुक करतात?एक दुजे के वास्ते ही मालिका प्रेक्षकांना खूपच आवडायची. या मालिकेतील माझी व्यक्तिरेखा, निकिता दत्तासोबतची माझी केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. त्यामुळे माझे फॅन्स या मालिकेविषयी माझ्याशी गप्पा मारतात. तसेच ही मालिका खूपच लवकर बंद झाली अशी त्यांना खंत असल्याचे देखील ते मला सांगतात. Also Read : विक्रम सिंह चौहान आणि नमीक पॉलमध्ये आहे एक गोष्ट कॉमन