Join us

मृणाल पूजासाठी फोटोग्राफर बनला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2016 13:11 IST

नागार्जुन एक योद्धा या मालिकेच्या सेटवर सध्या वेगळेच वातावरण पाहायला मिळत आहे. या मालिकेत प्रमुख भूमिका साकाराणारे मृणाल जैन आणि ...

नागार्जुन एक योद्धा या मालिकेच्या सेटवर सध्या वेगळेच वातावरण पाहायला मिळत आहे. या मालिकेत प्रमुख भूमिका साकाराणारे मृणाल जैन आणि पूजा बॅनर्जी हे एकमेकांचे चांगले फ्रेंड्स झाले आहेत. मृणालला फोटो काढायला खूप आवडतात. त्यामुळे चित्रीकरण नसल्यास मृणाल पूजाचे खूप सारे फोटो काढतो. याविषयी पूजा सांगते, "मृणाल खूप छान फोटोग्राफर आहे. त्याने माझे काढलेले फोटो माझ्या आईवडिलांनाही खूप आवडले आहेत. फोटो काढताना मी कोणते कपडे घालावेत. बॅकराऊंडनुसार कोणते कपडे अधिक फुलून दिसतील हेही मृणाल मला सुचवतो. मृणालने माझे फोटो काढले तर ते उत्तम येणारच हे मला माहीत असते."