Join us

या कारणांमुळेच तिने ग्लॅमरच्या दुनियेपासून लांब राहण्याचा निर्णय घेतला? वाचा काय आहेत ती कारणं

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2016 16:51 IST

'नकाब', 'थ्री','खट्टा मीठा'.'आक्रोश','चक्रधर' सिनेमात अभिनेत्री उर्वशी शर्माने बॉलिवूडमध्ये काम केले आहे. मात्र हे सिनेमे फारसे काही कमाल दाखवू शकले ...

'नकाब', 'थ्री','खट्टा मीठा'.'आक्रोश','चक्रधर' सिनेमात अभिनेत्री उर्वशी शर्माने बॉलिवूडमध्ये काम केले आहे. मात्र हे सिनेमे फारसे काही कमाल दाखवू शकले नाही. त्यानंतर सिनेनिर्माता सचिन जोशीसह ती विवाह बंधनात अडकली.कुटुंबाला वेळ देता यावा म्हणून तिने सिनेमात काम करणे बंद केले. त्यानंतर उर्वशीने ग्लॅमरच्या दुनियेत मागे वळून पाहिलेच नाही. रूपेरी पडद्यावर फारशी कमाल न दाखवू शकलेल्या उर्वशीला मालिकांसाठी ब-याच ऑफर्स आल्या. याचकारणामुळे 'अम्मा' या मालिकेतून छोट्या पडद्यावर उर्वशीने एंट्री घेतली होती.हळुहळु रसिक उर्वशीच्या मालिकेतल्या भूमिकेला पसंतीही देत होते.मात्र उर्वशीला लहान मुलगी असल्यामुळे जास्त वेळ शूटिंगला देणे शक्य होत नव्हते. त्यात मालिकेचे शूट मुंबईत न होता हैद्राबाद येथील रामोजी फिल्म सिटीमध्ये होत होते.शुटसाठी आठवड्यातली 5 दिवस तरी तिला हैद्राबादला जावे लागायचे. उर्वशीला एक लहान मुलगी आहे.शुटींगमुळे तिला तिच्या मुलीला वेळ देता येत नव्हता. शूटींग दरम्यान वेळोवेळी तिच्या मुलीची ती विचारणा करत असायची मात्र मुली पासून जास्त दिवस लांब राहणे शक्य नव्हते. त्यामुळे तिने 'अम्मा' या मालिकेतून एक्झिट घेण्याचा निर्णय घेतला.कुटुंब हीच आपली पहिली प्रायोरिटी म्हणत झगमगाटी दुनियेपासून लांब राहत ती तिचे खासजगी आयुष्य एंजॉय करतेय.