Join us

निशाने दिले करणला सुंदर गिफ्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2016 20:11 IST

गेल्या आठवड्यातच बिग बॉसच्या घरातून बाहेर पडलेल्या करण मेहरा याला पत्नी निशा रावल हिने एक सुंदर गिफ्ट दिले आहे. ...

गेल्या आठवड्यातच बिग बॉसच्या घरातून बाहेर पडलेल्या करण मेहरा याला पत्नी निशा रावल हिने एक सुंदर गिफ्ट दिले आहे. तसेच लग्नाच्या वाढदिवसानिमित्त करण तिच्याजवळ असल्याने ती सध्या खूपच आनंदात आहे. गेल्या गुरुवारी (२४ नोव्हेंबर) दोघांनीही लग्नाचा वाढदिवस जल्लोषात साजरा केला. निशाने यावेळी करणसाठी एक खास गिफ्ट आणले होते. ते गिफ्ट म्हणजे एक व्हिडीओ होता. या व्हिडीओमध्ये अशा मोमेंट्स शूट करण्यात आल्या होत्या, ज्यामध्ये करण नव्हता. करण नसताना निशाने त्याला किती मिस केले हे तिला या व्हिडीओच्या माध्यमातून सांगायचे होते. विशेष म्हणजे या व्हिडीओमध्ये ‘ए दिल है मुश्किल’ या चित्रपटातील एका गाण्याचा समावेशही करण्यात आला होता. लग्नाच्या वाढदिवसाचे आणखी एक वैशिष्ट्ये म्हणजे यावेळी एका खास पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. ज्यामध्ये त्यांचे क्लोज फ्रेंड सहभागी झाले होते. करण आणि निशाची कॉमन फ्रेंड माही विज हिने पाटीर्तील काही फोटोज़ इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. ज्यामध्ये सगळेच मस्तीच्या मूडमध्ये दिसत आहेत.