Join us

अमेय वाघ आणि स्वप्नील जोशी यांचे खट्याळ सूत्रसंचालन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2019 06:30 IST

'महाराष्ट्राचा फेवरेट कोण?'च्या दहाव्या पर्वाचे सूत्रसंचालन अमेय वाघ आणि स्वप्नील जोशी यांनी केले.

झी टॉकीज वाहिनीवर 'महाराष्ट्राचा फेवरेट कोण?' हा पुरस्कार सोहळा, नेहमीच प्रेक्षकांच्या आवडीचा ठरतो. नुकताच हा पुरस्कार सोहळा दिमाखात पार पडला. 'फेवरेट चित्रपट', 'फेवरेट अभिनेता', 'फेवरेट अभिनेत्री', 'फेवरेट स्टाईल आयकॉन', 'फेवरेट गीत' इत्यादी पुरस्कार तर महत्त्वपूर्ण विभाग नेहमीच असतात; पण यंदा गमतीशीर सूत्रसंचालनाने सोहळ्याची रंगत आणखी वाढवली.

'महाराष्ट्राचा फेवरेट कोण?'च्या दहाव्या पर्वाचे सूत्रसंचालन अमेय वाघ आणि स्वप्नील जोशी यांनी केले. त्यांच्यातील मैत्री, ऑफस्क्रीनही कशी घट्ट आहे, याचा प्रत्यय त्यांच्या सूत्रसंचालनातून आला. एकमेकांशी उत्तम केमिस्ट्री ठेवत त्यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले. प्रेक्षकांमध्ये बसलेल्या कलाकारांची थट्टामस्करी करत, वातावरणात रंगत आणली. ही थट्टा सुरु असताना,त्यातून कुणीही सुटणार नाही, याची पुरेपूर काळजी दोघा मित्रांनी घेतली. उत्तम अभिनेते असलेले हे दोघे, तितक्याच उत्तम विनोदबुद्धीचा नजराणा पेश करताना पाहायला मिळतील. आपल्या विनोदांनीसाऱ्यांचे मनोरंजन करत असतानाच, वैदेही परशुरामीशी फ्लर्ट करण्याची संधीदेखील या दोघांनी सोडली नाही. खोडकर स्वभावाचा पुरेपूर वापर करत या द्वयीने घातलेला धुमाकूळ प्रेक्षकांच्या मनावरभुरळ घालून गेला. अमेय वाघ आणि सोबतीला स्वप्नील जोशीचे खट्याळ सूत्रसंचालन पाहण्यासाठी, रविवार २४ फेब्रुवारी २०१९ रोजी, संध्याकाळी ६.३० वाजता झी टॉकीज बघायला विसरू नका.

टॅग्स :अमेय वाघस्वप्निल जोशी