Join us

बालिकावधू मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2016 11:09 IST

बालिकावधू या मालिकेत बालविवाह या प्रथेवर प्रकाशझोत टाकण्यात आला होता. या मालिकेची कथा प्रेक्षकांना प्रचंड भावली होती. चिमुकल्या आनंदीने ...

बालिकावधू या मालिकेत बालविवाह या प्रथेवर प्रकाशझोत टाकण्यात आला होता. या मालिकेची कथा प्रेक्षकांना प्रचंड भावली होती. चिमुकल्या आनंदीने तर प्रेक्षकांचे मन जिंकले होते. त्यानंतर प्रत्युषा बॅनर्जीनेही या मालिकेची लोकप्रियता टिकवून ठेवली होती. पण नंतरच्या काळात या मालिकेचा टिआरपी ढासळत गेला. सध्या माही विज आणि रुसलान मुमताज या मालिकेत प्रमुख भूमिका साकारत आहेत. पण या दोघांनाही प्रेक्षकांचे मन जिंकता आले नाही. मालिकेच्या ढासळलेल्या टिआरपीमुळे 31 जुलैला ही मालिका संपवण्याचा निर्णय वाहिनीकडून घेण्यात आला आहे. या मालिकेचा शेवटचा भाग 22 जुलैला चित्रीत केला जाणार असल्याचे म्हटले जात आहे.