Join us  

'येड लागलं प्रेमाचं' मालिकेत अतिशा नाईक दिसणार निगेटिव्ह भूमिकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2024 5:03 PM

'येड लागलं प्रेमाचं' (Yed Lagala Premacha) या मालिकेत पंढरपुरच्या मातीत रंगलेली रांगडी प्रेम कहाणी पाहायला मिळणार आहे.

सध्या छोट्या पडद्यावर नवनवीन मालिका दाखल होत आहेत. २७ मे पासून स्टार प्रवाह वाहिनीवर एक नवीन मालिका दाखल झाली आहे. या मालिकेचं नाव आहे येड लागलं प्रेमाचं (Yed Lagala Premacha). या मालिकेत पंढरपुरच्या मातीत रंगलेली रांगडी प्रेम कहाणी पाहायला मिळणार आहे. या मालिकेत  सुप्रसिद्ध अभिनेत्री अतिशा नाईक (Atisha Naik) या मालिकेतून खलनायिकेच्या रुपात भेटीला येणार आहे.

शशीकला असं त्यांच्या व्यक्तिरेखेचं नाव असून कोणाचही भले झालेले तिला आवडत नाही. प्रत्येकाबद्दलच तिच्या मनात एक असूया आहे. अभिनेत्री होण्याचं शशीकलाचं स्वप्न होतं. मात्र हे स्वप्न अधुरच राहिलं. त्यामुळे नटण्याची तिला प्रचंड आवड आहे. स्वार्थी, अप्पलपोटी आणि पैशांचा माज दाखवणारी अशी ही शशीकला साकारताना अभिनेत्री म्हणून कस लागत आहे अशी भावना अतिशा नाईक यांनी व्यक्त केली. 

या भूमिकेबद्दल अतिशा नाईक म्हणाल्या, मी आजवर अनेक खलनायिका साकारल्या. मात्र शशीकलाची बातच न्यारी आहे. तिची घरात प्रचंड दहशत आहे. तिच्या पेहरावातून, चालण्यातून, बोलण्यातून याची कल्पना येते. मला खात्री आहे शशीकलाचा अंदाज प्रेक्षकांना नक्कीच भावेल. शशीकलाच्या दागिन्यांची, तिच्या साड्यांची नक्कीच चर्चा रंगेल. शशीकलाचा मालिकेतली मुख्य नायिका म्हणजेच मंजिरीवर विशेष राग आहे. मंजिरी या घरात नसती तर एव्हाना शशीकलाने संपूर्ण घर आपल्या नावावर करुन घेतलं असतं. मंजिरीच्या सुरळीत होणाऱ्या गोष्टींमधे अडचणी आणून त्या कुटुंबाची कोंडी करायची हे काम शशीकला नेटानं करत असते. शशीकलाचे डाव यशस्वी होतात का हे पहायचं असेल तर नवी मालिका येड लागलं प्रेमाचं २७ मे पासून रात्री १० वाजता फक्त स्टार प्रवाहवर पाहावी लागेल.

 

टॅग्स :अतिशा नाईक