Join us

'मीत' मालिकेच्या सेटवर लागली आग, याबाबत आशी सिंगने दिली मोठी अपडेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2023 19:01 IST

Meet : 'मीत' मालिकेच्या सेटवर आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचे समोर आले आहे.

हिंदी छोट्या पडद्यावरील मालिका मीत बदलेगी दुनिया की रीत(Meet Serial)च्या सेटवर अचानक आग लागल्याचे समोर आले आहे. आगीचे वृत्त समोर येताच चाहते चिंतेत आहेत. दरम्यान आता या मालिकेतील अभिनेत्री आशी सिंगने आग कशी लागली याबद्दल सांगितले. मीरा रोड येथील मालिकेच्या सेटला लागलेल्या आगीबाबत माहिती अभिनेत्रीने दिली आहे. तिने सांगितले की, शॉर्ट सर्किटमुळे सेटवर आग लागली. मीत मालिकेत आशी सिंग आणि शगुन पांडे या मुख्य भूमिकेत आहेत.

पिंकविलाच्या रिपोर्टनुसार, सेटवरील एका खोलीच्या एअर कंडिशनरमध्ये शॉर्ट सर्किट झाले. त्यामुळे सेटला आग लागली. ती खोली पूर्णपणे जळून खाक झाली आहे, त्यामुळे तेथे ठेवलेले कॅमेरे आणि इतर उपकरणे वेळीच बाहेर काढण्यात आली. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. याशिवाय शॉर्ट सर्किटचे मूळ कारण शोधण्यासाठी सध्या तपास सुरू आहे, जेणेकरून भविष्यात होणारे अपघात टाळता येतील.

या मालिकेतील अभिनेत्री आशी सिंग म्हणाली की, 'सेटवरील सर्वजण ठीक आहेत. एक छोटीशी आग लागली होती जी ती फक्त एका खोलीतच लागली होती. त्या खोलीचा एसी नीट काम करत नव्हता. प्रत्येकजण सुरक्षित आहेत. कारण त्या खोलीत कोणीच नव्हते. सर्वजण सेटवर होते आणि आम्ही शूटिंगही पुन्हा सुरू केले. आता सर्व काही चांगले आणि सुरक्षित आहे काळजी करण्यासारखे काही नाही.

मीत मालिकेबद्दल सांगायचं तर, मीत हुड्डाने चीकूला अपहरणकर्त्यांपासून कसे वाचवले हे मालिकेत दाखवण्यात आले होते. मीत आता तिच्या मुलाला अमेरिकेत जाण्यापासून रोखू शकेल का? या मालिकेत हे जाणून घेणे खूप मनोरंजक असेल.