Join us  

‘दिल है हिंदुस्तानी-2’मध्ये आशा भोसले आणि बेनी दयाल यांनी लावली उपस्थिती

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2018 6:53 PM

‘दिल है हिंदुस्तानी-2’ या शोमध्ये कृष्ण जन्माष्टमीच्या विशेष भागात भारतातील दिग्गज पार्श्वगायिका आशा भोसले आणि संगीत क्षेत्रातील एक नामवंत गायक बेनी दयाल सहभागी झाले होते. यावेळी या दोघांनी बॉलीवूडमधील जन्माष्टमीशी संबंधित अनेक गाणी कार्यक्रमाचे परीक्षक तसेच स्पर्धकांबरोबर गायली.

ठळक मुद्दे ‘दिल है हिंदुस्तानी-2’ चा कृष्ण जन्माष्टमी विशेष भागआशा भोसलेंनी स्पर्धकांना दिल्या टिप्स

 ‘स्टार प्लस’ वाहिनीवरील ‘दिल है हिंदुस्तानी-2’ या शोमध्ये कृष्ण जन्माष्टमीच्या विशेष भागात भारतातील दिग्गज पार्श्वगायिका आशा भोसले आणि संगीत क्षेत्रातील एक नामवंत गायक बेनी दयाल सहभागी झाले होते. यावेळी या दोघांनी बॉलीवूडमधील जन्माष्टमीशी संबंधित अनेक गाणी कार्यक्रमाचे परीक्षक तसेच स्पर्धकांबरोबर गायली. यावेळी आशाताईंनी बालस्पर्धकांबरोबर मटकीतोड खेळ खेळल्याने या कार्यक्रमाला वेगळीच खुमारी आली. हा कार्यक्रम म्हणजे धमालमस्तीबरोबरच ज्ञानार्जनही होते कारण आशातईंनी आपले अनेक अनुभव आणि गायनाविषयीच्या महत्त्वाच्या टिप्स स्पर्धकांना कथन केले.

यावेळी आशा भोसले म्हणाल्या, भारतीय संगीतात रुची दाखवणाऱ्या अशा दर्जेदार आणि गुणी स्पर्धकांबरोबर सहभागी होताना मला खूपच आनंद वाटत आहे. भारतीय संगीत हे अतिशय व्यापक असून ‘दिल है हिंदुस्तानी-2’मध्ये त्याचा खूपच मोठ्या प्रमाणात आढावा घेतला जात आहे. या कार्यक्रमात भारतीय संगीताचा सन्मान केला जात असून त्यात या संगीतावर प्रेम करणारे जगभरातील स्पर्धक सहभागी  होताना दिसतात. अशा लोकांबरोबर जन्माष्टमीचा कार्यक्रम साजरा करताना मला खूपच आनंद वाटला. अशा गुणी स्पर्धकांना काही सल्ला देता आला, याबद्दल मी स्वत:ला सुदैवी समजते आणि त्यांच्या गाण्यांनी मला पूर्वीच्या काळात नेले.दिल है हिंदुस्तानी-2 हा भारतीय संगीताच्या प्रेमामुळे देशांच्या सरहद्दी पुसून टाकणारा आणि हिंदुस्तानी संगीतावर प्रेम करणाऱ्या जगभरातील संगीतप्रेमींना एकत्र आणणारा रिएलिटी कार्यक्रम आहे. भारतीय संगीताचा प्रभाव अधोरेखित करणारा आणि जगभरातील स्पर्धकांकडून लोकप्रिय भारतीय संगीताला नवा आयाम देणाऱ्या या कार्यक्रमात जगभरातील हिंदुस्तानींचे एक संमेलनच भरलेले असते. या कार्यक्रमात जगभरातील गुणी गायक आणि संगीतकार लोकप्रिय भारतीय गाणी गातील. पण ती गाणी ते स्वत:च्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीत गातात.

 

 

टॅग्स :आशा भोसलेस्टार प्लस