Join us

अरूंधती स्वीकारणार आशुतोषची ही ऑफर; अनिरूद्ध आणि संजनाचा होणार जळफळाट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2021 13:06 IST

Aai Kuthe Kay Karte: आई कुठे काय करते मालिकेत आता नवीन ट्विस्ट पाहायला मिळणार आहे.

आई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte) मालिकेत आता नवीन ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. जेव्हा पासून या मालिकेत आशुतोष या पात्राची एन्ट्री झाली आहे तेव्हापासून ही मालिका एका वेगळ्याच वळणावर आली आहे. अनिरुद्ध आणि संजनाचे लग्न झाले असले तरी अनिरूद्धला अरुंधतीने आशुतोषशी केलेली मैत्री फारशी पटत नाही. त्यामुळे सातत्याने देशमुख कुटुंबात वाद होताना दिसत आहेत.

सामाजिक संस्थेच्या कार्यक्रमात अरूंधती आणि आशुतोष यांची भेट होते. ते दोघे कॉलेजचे मित्र असतात. मात्र अरुंधतीला फारसे काही आठवत नाही. अरूंधती आशुतोषला कॉलेजच्या दिवसात खूप आवडत होती. त्यामुळे तो आजही सिंगलच आहे. दरम्यान कार्यक्रमा निमित्त त्यांची भेट झाल्यानंतर त्यांची बऱ्याचदा भेट होते. त्यानंतर आशुतोष अरुंधतीला त्याच्या दोन अल्बमसाठी गाण्याची ऑफर देतो. अरूंधती सुरूवातीला नाही म्हणते मात्र यश आणि ईशाच्या सांगण्यावरून तयार होते. हे सर्व कांचन आई, अभिषेक आणि अनिरुद्धला खूप खटकते. इतकेच नाही या अल्बमसाठी यशदेखील काम करतो आहे. त्या गाण्याच्या निमित्ताने अरूंधतीचे आशुतोषसोबतच्या भेटीगाठी वाढत आहेत. त्यामुळे अनिरूद्ध सतत त्या वरून अरुंधतीला टोमणे मारत असतो. 

अनिरूद्ध आणि संजनाचा होणार जळफळाटदरम्यान आशुतोषला एका म्युझिक इस्टिट्यूट सुरू करायची आहे आणि तिथे अरूंधतीने काम करावे अशी त्याची इच्छा असते. मात्र आता तर तो अरूंधतीला म्युझिक स्कूलची पन्नास टक्के पार्टनर होणार आहे. आता तर हे समजल्यानंतर अनिरूद्ध आणि संजनाचा खूप जळफळाट होणार आहे. कारण अनिरूद्ध आणि संजना दोघेही सध्या बेरोजगार आहेत. त्यात अरूंधतीची होणारी प्रगती त्यांना फारच खटकते आहे. 

टॅग्स :आई कुठे काय करते मालिका