Join us  

'... तर मी या घरी परत येईन','आई कुठे काय करते' मालिकेत अरुंधतीने संजनाला दिला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2021 1:31 PM

'आई कुठे काय करते' मालिकेच्या नव्या प्रोमोने वाढवली प्रेक्षकांची उत्सुकता

स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करतेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. मालिकेत नुकतेच नवीन वळण आले आहे. अंकिताचा खोटारडेपणा सर्वांसमोर आल्यानंतर तिला देशमुखांच्या घरातून बेदखल करण्यात आले. त्यानंतर आता अरुंधती आणि अनिरुद्धदेखील लवकरच कायदेशीररित्या वेगळे होणार आहेत. त्यात त्यांच्या घटस्फोटाची वाट पाहणारी संजना गुडघ्याला बांशिंग बांधूनच तयार आहे. नुकताच स्टार प्रवाह वाहिनीने त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. जो पाहून प्रेक्षक उत्सुक झाले आहेत.

स्टार प्रवाह वाहिनीने इंस्टाग्राम अकाउंटवर आई कुठे काय करते मालिकेचा नवा प्रोमो शेअर करत लिहिले की, '... तर मी या घरी परत येईन', अरुंधतीने संजनाला दिला इशारा...'आई कुठे काय करते !' महाएपिसोड...रविवार ११ जुलै दु.१:०० आणि रात्री ८:०० वा. स्टार प्रवाहवर...

या व्हिडीओत पहायला मिळते आहे की,  संजना तिच्या आणि अनिरुद्धच्या लग्नाची पत्रिका अरुंधतीला देताना दिसते आहे. त्यावर अरुंधती म्हणाली की, तुला लग्न करायचंय, पत्रिका छापायच्या आहेत. तू इथे असताना जर मला कळलं की आई आणि आप्पांची आभाळ होते आहे. तर मी त्याच क्षणी इथे येणार. त्यावेळी मी हा विचार करणार नाही की माझा घटस्फोट झाला आहे किंवा तुझे लग्न झाले आहे. त्यामुळे आता नेमके काय घडणार हे पाहण्यासाठी या मालिकेचा महाएपिसोड पहावा लागेल.

या प्रोमोला प्रेक्षकांची खूप पसंती मिळते आहे आणि त्यावर कमेंट्सचा वर्षाव होताना दिसतो आहे. प्रेक्षक हा महाएपिसोड पाहण्यासाठी उत्सुक असल्याचे पहायला मिळत आहे.

टॅग्स :आई कुठे काय करते मालिकास्टार प्रवाह