Join us  

अर्शी खानने शिल्पा शिंदेला म्हटले, ‘यूजलेस फ्रेंड’!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2018 10:28 AM

कलर्स चॅनेलवर प्रसारित होणारा ‘बिग बॉस’ या शोचा ११वा सीजन संपून आता चार आठवड्यांपेक्षा अधिक काळ झाला आहे. परंतु ...

कलर्स चॅनेलवर प्रसारित होणारा ‘बिग बॉस’ या शोचा ११वा सीजन संपून आता चार आठवड्यांपेक्षा अधिक काळ झाला आहे. परंतु स्पर्धकांमध्ये शोदरम्यान सुरू झालेला वाद अजूनही संपण्याचे नाव घेताना दिसून येत नाही. काही दिवसांपूर्वीच शोची विजेता आणि टीव्ही अभिनेत्री शिल्पा शिंदेने एका मुलाखतीत म्हटले होते की, अर्शी खान तिचे नाव केवळ पब्लिसिटी मिळविण्यासाठी वापरत आहे. याच संदर्भात जेव्हा अर्शी खानला प्रश्न विचारण्यात आला तेव्हा अर्शीने शिल्पा शिंदेला यूजलेस फ्रेंड असे म्हटले. बिग बॉस शोदरम्यान, अर्शी आणि शिल्पा शिंदेमध्ये चांगलाच कोल्डवॉर बघावयास मिळाला. दोघींच्या वादाने प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन केले. बॉलिवूड लाइफ डॉट कॉमच्या एका रिपोर्टनुसार, अर्शीने हसत हसत म्हटले की, ‘ओह... तर मी तिचे नाव पब्लिसिटी मिळविण्यासाठी वापरत आहे, त्यामुळेच ती माझे सर्व इंटरव्ह्यू आणि वक्तव्य फॉलो करीत आहे. आता मी तिला माझ्याबद्दल बोलणे आणि माध्यमांमध्ये हेडलाइन निर्माण करण्याची संधी देणार आहे.’ यावेळी जेव्हा अर्शीला शिल्पाचे लग्न आणि विकास गुप्ताविषयी विचारले तेव्हा तिने म्हटले की, ‘आपण दुसºयांविषयी का बोलतो? जर लोक मला शिल्पाविषयी विचारत असतील अन् मला तिच्याविषयी माहिती असेल तर नक्कीच त्याचे उत्तर देणार, आतापर्यंत मी तेच केले आहे. मी याठिकाणी तिच्याविषयी गॉसिप करीत नाही, तर विचारलेल्या प्रश्नांचे केवळ उत्तरे देत आहे.’पुढे बोलताना अर्शीने म्हटले की, मला तिला फक्त एकच सांगायचे आहे की, ती एक सेलिब्रिटी आहे. त्यामुळे तिने थोडेसे शांत व्हायला हवे. तिने प्रत्येक गोष्टीवर रिअ‍ॅक्ट होऊ नये. जर ती सातत्याने अशाप्रकारे बोलत राहिली तर लोक विचार करतील की, ती मित्रांचा सन्मान करीत नाही. माझ्याबद्दल सांगायचे झाल्यास आजही जेव्हा मी बिग बॉसच्या सर्व स्पर्धकांचा फोटो सोशल मीडियावर बघत असते, तेव्हा मला सर्व फॅमिली मेंबरसारखे वाटतात. मला आठवतेय की, कोणीतरी बिग बॉस शोमध्ये मला म्हटले होते की, जर तू ‘मॉँ’ असे म्हटले आहे तर तिचा सन्मान कर. मला माहिती नाही की, शिल्पाला माझ्याविषयी काय अडचण आहे. जर शिल्पाला माझ्याबद्दल काही अडचण असेल तर तिने फोनवर याविषयी माझ्याशी बोलावे. माध्यमांमध्ये बोलण्याची गरजच काय?’