Join us  

‘मेरे रश्के कमर’वर अर्शी खानने धरला ठेका, व्हिडीओ व्हायरल!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2018 1:25 PM

बिग बॉसच्या घरात वादाचा विषय ठरलेली अर्शी खान सध्या घराबाहेरही तिच्या कारनाम्यांमुळे चर्चेत राहत आहे. सध्या तिचा एक व्हिडीओ व्हायरल होत असून, त्यामध्ये ती ‘मेरे रश्के कमर’ या गाण्यावर ती ठेका धरताना दिसत आहे.

बिग बॉसच्या सीजन : ११ मध्ये आपल्या बोल्ड अदानी खळबळ उडवून देणारी अर्शी खान बिग बॉसच्या घराबाहेरही सातत्याने कुठल्या ना कुठल्या कारणाने चर्चेत राहत आहे. बिग बॉसच्या घरात अर्शी खान आणि हितेन तेजवानी ही जोडी प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली होती. त्याचबरोबर शिल्पा शिंदेसोबत तिचे ‘मां-बेटी’चे नातेही शोमध्ये हॉट टॉपिक बनले होते. सध्या अर्शी खान एकता कपूर एमटीव्ही बॉक्स क्रिकेट लीगमध्ये सहभागी होण्याची तयारी करीत आहे. यामुळे ती सातत्याने चर्चेतही राहत आहे. कारण याठिकाणी केवळ क्रिकेटच खेळले जात नसून, ग्लॅमरचाही तडका लावला जातो. त्यामुळेच की काय, एका प्रसंगादरम्यान, अर्शी चक्क ‘मेरे रश्के कमर’ या प्रसिद्ध गाण्यावर ठेका धरताना बघावयास मिळाली. सध्या अर्शीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. वास्तविक अर्शी खानला ‘वादाची मलिका’ म्हटले जाते. कारण जेव्हा ती बिग बॉसच्या घरात होती, तेव्हा सातत्याने ती वादाच्या भोवºयात राहायची. तिच्याबद्दल विविध प्रकारच्या बातम्या समोर येत होत्या. बिग बॉसच्या घरात प्रियांक शर्माने तिच्यावर निशाणा साधल्यानेच, तिचे काही भूतकाळातील प्रकरणे बाहेर आले होते. ड्रामा क्वीन हिना खाननेही तिच्यावर विचित्र स्वरूपाच्या कॉमेण्ट केल्या होत्या. परंतु अर्शी खानने याची तमा न बाळगता बिग बॉसच्या घरात आपला जलवा कायम ठेवला. विकास गुप्ताबरोबरची तिचे मैत्री चर्चेचा विषय ठरली. घराबाहेर या दोघांमध्ये मैत्री कायम असल्याचे बोलले जाते.  दरम्यान, अर्शी खान सध्या बॉक्स क्रिकेट लीगमध्ये मौजमस्ती करण्याची एकही संधी सोडताना दिसत नाही. बºयाचवेळा ती चक्क अम्पायरसोबत नाचताना दिसत आहे. खरं तर अर्शी खान जे काही करते, त्यामध्ये धमाल अधिक असते. अर्शी खान व्यतिरिक्त बीसीएलमध्ये ड्रामा क्वीन राखी सावंतही चांगलीच चर्चेत राहत आहे. दोघींचे किस्से सध्या सोशल मीडियावर चांगलेच चर्चिले जात आहेत.