Join us  

Bigg Boss Marathi 2 : शिव आणि आरोहमध्ये कशावरून झाला वाद ?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2019 1:28 PM

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सदस्यांमध्ये वाद होण्यासाठी काही मोठ कारण लागतच असे नाही. अगदी छोट्या कारणावरूनही हे वाद घरामध्ये झाले आहेत आणि होतात.

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सदस्यांमध्ये वाद होण्यासाठी काही मोठ कारण लागतच असे नाही. अगदी छोट्या कारणावरूनही हे वाद घरामध्ये झाले आहेत आणि होतात. सध्या घरामध्ये सात बारा हे साप्ताहिक कार्य सुरु आहे. ज्यामध्ये सदस्यांचे खटके उडायला सुरुवात झाली आहे. काल अभिजीत आरोहला म्हणाला तुला हळूहळू कळेल कोण कस खेळत ते. तर आज देखील आरोह आणि नेहामध्ये वाद होणार आहे. आरोहचे नेहाला म्हणणे आहे चीटिंग करू नकोस. पण टास्कमध्ये आरोह शिवला अस काय म्हणाला ज्याचा राग शिवला आला आणि त्याने आरोहला जाब विचारला. इतकेच नसून हीनाबरोबर देखील शिवची बाचाबाची होताना दिसणार आहे.

आरोहने शिवबद्दल रोडीज कार्यक्रमाला धरून एक वक्तव्य केले ज्याचा राग शिवला आला. आणि तो आरोह म्हणाला, जर आता रोडीज जर दाखवला ना तुला तर तू उभा पण नाही रहाणार इथे. मी प्रेमाने घेतो आहे, टास्क संपला कि गोष्ट संपली... मी काही वैयक्तिक बोलतो का तुझ्याशी ? मी टास्कनंतर सगळ मिटवतो... जर तुला रोडीज काढायचं असेल तर मी तशी उत्तर देऊ का ? आरोह त्यावर म्हणाला, तुला जशी उत्तर द्यायची तशी दे ... शिवचे म्हणणे पडले तुला हे मिटवायचे आहे कि वाढवायचे आहे ? मी त्या भाषेमध्ये बोलू शकतो. तुला जर रोडीज काढायचे आहे तर मी दाखवू का तुला ? त्यावर आरोह म्हणाला, “काय दाखवणार आहेस तू ” ? आणि वाद वाढला... बघूया पुढे काय होईल ...

शिव आणि हीनामध्ये देखील आज टास्कवरून वाद होणार आहे... “तुम्हाला खेळायला नाही येत तर गप बसं, तू मला नको सांगूस”. हीनाचा शिवला सल्ला... शिवचा आवाज चढला हीनाला त्याने विचारले “तू शिकवशील का आता मला”? त्यावर हीनाचे म्हणणे होते, “तुम्हांला हीच भाषा समजते”. शिवचे म्हणणे आहे, “तू उत्तर देऊन दाखव, त्या भाषेत मी उत्तर देईन.

टॅग्स :बिग बॉस मराठीशीव ठाकरे