अर्जुनचा लकी चार्म
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2016 17:05 IST
नागिन, कवच...काली शक्तियो से यांसारख्या मालिकेमुळे अर्जुन बिजलानी चांगलाच चर्चेत आला. या मालिकांमधील त्याचे काम प्रेक्षकांना प्रचंड आवडले. तसेच ...
अर्जुनचा लकी चार्म
नागिन, कवच...काली शक्तियो से यांसारख्या मालिकेमुळे अर्जुन बिजलानी चांगलाच चर्चेत आला. या मालिकांमधील त्याचे काम प्रेक्षकांना प्रचंड आवडले. तसेच त्याने झलक दिखला जा या कार्यक्रमात आपल्या नृत्याचे कौशल्यही दाखवले होते आणि आता परदेस मे है मेरा दिल या मालिकेत तो प्रमुख भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. अर्जुनला गेल्या काही महिन्यांमध्ये मालिकांच्या खूप चांगल्या ऑफर्स येत आहे. तसेच त्याला चांगली लोकप्रियतादेखील मिळत आहे. या सगळ्या यशाचे श्रेय अर्जुन त्याचा मुलगा अयानला देतो. अयान त्याच्या आयुष्यात आल्यानंतर त्याच्या आयुष्यात अनेक चांगल्या गोष्टी घडल्या. त्यामुळे अयान त्याच्यासाठी लकी असल्याचे तो मानतो. तो त्याच्या कामात कितीही व्यग्र असला तरी त्याच्या मुलाला तो वेळ देतो. दिवसातील त्याचे 12 तास चित्रीकरणात तर दोन तास प्रवासात जातात. तरीही घरी गेल्यानंतर न थकता मी मुलासोबत खूप खेळतो असे तो सांगतो.