छोट्या पडद्यावर ए.आर. रेहमान आणि रजनीकांत यांच्यासोबत शाहरूख बनला वक्ता
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2018 14:19 IST
शाहरूख खानच्या टेड टॉक्स इंडिया नयी सोच शोच्या पहिल्या सीझनचा फिनाले एपिसोड आता जवळ आला असून निर्माते शाहरूखसोबतच ह्या ...
छोट्या पडद्यावर ए.आर. रेहमान आणि रजनीकांत यांच्यासोबत शाहरूख बनला वक्ता
शाहरूख खानच्या टेड टॉक्स इंडिया नयी सोच शोच्या पहिल्या सीझनचा फिनाले एपिसोड आता जवळ आला असून निर्माते शाहरूखसोबतच ह्या शो च्या दुसऱ्या सीझनच्या तयारीत आहेत.ह्या शोमधील वक्त्यांकडून शाहरूखने प्रेरणा घेतली असून पुढील सीझनमधील पहिल्या भागात त्याने टेड टॉक द्यावा असा निर्मात्यांचा विचार आहे.निर्मात्यांनी संगीतकार ए.आर.रेहमान आणि सुपरस्टार रजनीकांत यांना वक्ता म्हणून येण्यास विचारले आहे.सूत्रांनी सांगितले,“निर्मात्यांना रेहमान पहिल्याच सीझनमध्ये हवे होते पण ते काही तारखांमुळे जमलं नाही.मात्र,नव्या सीझनसाठी त्यांचे नाव निश्चित झाले आहे.”ह्या सीझनमधील आगामी ७ व्या भागानंतर फिनाले एपिसोड असेल. त्यात ह्या सीझनमधील सर्वोत्तम ५ वक्ते येतील आणि पहिला सीझन जानेवारी २०१८ मध्ये संपेल. सूत्रांनी सांगितले,“ज्याप्रकारे हा शो बनला आहे त्याबद्दल निर्माते समाधानी आहेत आणि दुसऱ्या सीझनमध्येही शाहरूख खानने वक्ता म्हणून यावे असे त्यांना वाटत आहे. सध्या करारावर चर्चा सुरू आहे.वाहिनी अजूनही वक्त्यांना आणण्याच्या प्रक्रियेत असून तारखांचे नियोजन सुरू आहे. जर सगळं काही वेळेत पार पडलं तर दिवाळीच्या वेळेस दुसरा सीझन सुरू होईल.”Also Read:टेड टॉक्स इंडिया नई सोचमध्ये येण्यास या कारणामुळे ए.आर.रेहमानने दिला होता नकारया कार्यक्रमाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार टेड टॉक्स इंडिया नई सोच या कार्यक्रमाच्या एका भागासाठी रेहमान चित्रीकरण करणार होता. परंतु त्याने त्याच्या एका कामासाठी आधीपासूनच तारखा दिल्या असल्याने टेड टॉक्स इंडिया नई सोच या कार्यक्रमाच्या चित्रीकरणासाठी त्याच्याकडे तारीखच उपलब्ध नव्हती. रेहमानबरोबर कार्यक्रम करण्याच्या कल्पनेने शाहरूख खूपच उत्साहित झाला होता.त्याच्यासोबतचा भाग अतिशय चांगला व्हावा यासाठी तो त्याच्या मुले आणि कार्यक्रमाच्या टीमसोबत गाण्यांचा सरावही करीत होता.