Join us

‘जग्गा जासूस’साठी अनुराग बसूने आपली टीव्ही मालिका पुढे ढकलली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2017 12:08 IST

कोशीश… एक आशा, क्योंकि सास भी कभी बहू थी, कसौटी झिंदगी की, कहानी घर घर की आणि इतर अनेक ...

कोशीश… एक आशा, क्योंकि सास भी कभी बहू थी, कसौटी झिंदगी की, कहानी घर घर की आणि इतर अनेक मालिकांमधून अविस्मरणीय प्रसंग साकारणारा बॉलीवूडचा नामवंत दिग्दर्शक अनुराग बसू आता ‘लाईफ ओके’वरील ‘इंतकाम एक मासूम का’ या नव्या मालिकेद्वारे प्रेक्षकांना आश्चर्याचा धक्का देणार आहे. एक सूडकथा असलेली ‘इंतकाम एक मासूम का’ ही मालिका सध्या चांगलीच चर्चेत आहे. या मालिकेत चित्रपट आणि टीव्ही उद्योगातील अनेक नामांकित कलाकार महत्त्वाच्या भूमिका साकारणार आहेत. त्यात ‘ट्य़ूबलाइट’फेम रिकी पटेल, गुणी अभिनेता अविनाश सचदेवा, सर्वांची लाडकी मेघा गुप्ता तसेच लोकप्रिय मनीष गोएल यांचा समावेश आहे. आता या मालिकेच्या दिग्दर्शनाची जबाबदारी घ्यावी, यासाठी निर्मात्यांनी अनुराग बसू यांना गळ घातली आहे. “या मालिकेचा प्रत्येक भाग एखाद्या चित्रपटासारखा चित्रीत केला जाईल आणि प्रेक्षकांना असा भव्य व भारदस्त अनुभव मिळावा, यासाठी या मालिकेच्या दिग्दर्शनाची जबाबदारी अनुराग बसू यांनी घ्यावी, असा आग्रह निर्मात्यांनी धरला आहे. अनुराग यांनाही मालिकेची कथा-पटकथा फार आवडली आहे. त्यांनीही या गोष्टीस मान्यता दिली असून लवकरच यासंदर्भात करार होईल. पण ‘बर्फी’ चित्रपटाचे हे दिग्दर्शक आपल्या लांबलेल्या ‘जग्गा जासूस’ या चित्रपटाचं मार्केटिंग आणि जाहिरात करण्यात ते सध्या व्यग्र झाले आहेत. त्यामुळे या मालिकेच्या चित्रीकरणासाठी सोयीच्या तारखा मिळेपर्यंत ते ही मालिका पुढे ढकलणार आहेत,” असे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले. अनुराग बसू यांना लवकरच छोट्य़ा पडद्यावर पाहता येईल, अशी आशा आहे!